पुणे : कोरोनामुळे 2 वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता हेच नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी आता अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्या रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
या निर्णयाला पुण्यातील पालक आणि विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध केला होता. यावर्षी शाळांना उन्हाळ्याची सुट्टी मिळणार नाही, या कल्पनेनं हिरमुसलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर एप्रिल महिन्यात विनाकारण शाळा सुरु ठेवण्याची आवश्यकता नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलं आहे.
एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश
ज्या शाळा कोविड काळात अभ्यासक्रम पूर्ण करू शकल्या नाहीत त्यांनाच एप्रिलमध्ये शाळा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे, मांढरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच मे महिन्यात शाळांना सुट्टी असणार आहे. ज्यानंतर पुढील सत्र जूनच्या मध्यादरम्यान सुरु होणार असल्यानं शाळांना मे महिन्यात सुट्टी असेल. त्यामुळे मे महिन्यात सुट्टीचा कोणताही बेत आखला असेल तर तो बदलण्याची गरज नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Sindhudurg Narayan Rane : निधीसाठी नारायण राणेंनी घेतली उदय सामंतांची भेट