ETV Bharat / city

Omkareshwar Temple In Pune : पुण्यातील हे तब्बल 286 वर्ष जुने ओंकारेश्वर मंदिर; वाचा काय आहेत इतिहास - पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराचा इतिहास

पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे शंकराचे 286 वर्ष जुने असे एक पेशवेकालीन मंदिर आहे. ( staggering 286 year old Omkareshwar temple) या मंदिराला नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी (२ जुलै २०१२)रोजी आपल्या स्थापनेची (286)वर्षे पूर्ण करीत आहे.

ओंकारेश्वर मंदिर
ओंकारेश्वर मंदिर
author img

By

Published : Mar 1, 2022, 10:34 AM IST

पुणे - ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचे 286 वर्ष जुने असे एक पेशवेकालीन मंदिर आहे. या मंदिराला नक्षीकामाचे नऊ कळस, महर्षी व्यासांचे शिल्प, हाताची घडी घातलेले आणि डोक्यावर पगडी असलेले दत्तगुरूंचे शिल्प, अंतर्गत प्रदक्षिणामार्ग अशी आगळी वेगळी वैशिष्ट्ये असलेले पेशवेकालीन ओेंकारेश्वर मंदिर सोमवारी (२ जुलै २०१२)रोजी आपल्या स्थापनेची (286)वर्षे पूर्ण करीत आहे. (Omkareshwar Temple In Pune) नर्मदेवरून आणलेल्या बाणाची शिवलिंगाच्या तांबड्या पाषाणाच्या साळुंखेमध्ये प्रतिष्ठापना झाली तो आषाढ शुद्ध त्रयोदशीचा दिवस होता. हा योग साधून हे पेशवेकालीन मंदिर (287)व्या वर्षांत पदार्पण करीत आहे.

महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत

पेशव्यांनी ऑक्टोबर (1736)मध्ये या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम केला आणि पुढील वर्षी आषाढ शुद्ध त्रयोदशीच्या मुहूर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. 'गाय उतारी शिवालया करविले' असा त्याचा पेशवे दप्तरामध्ये उल्लेख आहे. अवघा खर्च पेशव्यांनी केला. (286 year old Omkareshwar temple in Pune) कामकाजाचे पौरोहित्य चित्रावशास्त्री यांनी केले, असेही पेशवे दप्तरामध्ये नमूद केले आहे. पेशव्यांतर्फे ओंकारेश्वराला दरवर्षी (1350) रुपये अधिक साडेसात रुपये इतके अनुदान दिले जात होते. याखेरीज महाशिवरात्रीला एक हजार रुपये स्वतंत्र दिले जात असत. त्याकाळी सोने 15 रुपये तोळा होते. यावरून या अनुदानाची रक्कम किती असावी याचा अंदाज येतो. अशी माहिती मंदिराचे विश्वस्त यांनी दिली आहे.

मुठा नदीच्या काठावर वसलेले हे ओमकारेश्वर मंदिर

महाशिवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील ओंकारेश्वर या मंदिरात आकर्षक अशी सजावट केलेली आहे. तसेच, मंदीत मंदिराला चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. मुठा नदीच्या काठावर वसलेले हे ओमकारेश्वर मंदिर फार प्राचीन कालीन असून त्याला (286)वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास आहे. महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी येतात.

हेही वाचा - Operation Ganga : युक्रेनमधून १८२ भारतीयांचे सातवे ऑपरेशन गंगा विमान मुंबईत पोहोचले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.