ETV Bharat / city

प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांचे 'थाळी बजाव आंदोलन'

author img

By

Published : Aug 18, 2020, 4:08 PM IST

संपूर्ण पुणे शहरात तीन हजार पेक्षा जास्त महिला सफाई कर्मचारी दारोदारी जाऊन कचरा गोळा करतात. या महिलांना अत्यंत कमी सेवा शुल्क मिळते. तसेच, कोणतीही विशेष आरोग्य सुरक्षा मिळत नसल्याने त्यांनी आज (मंगळवार) महापौर आणी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.

Thali Bajaw agitation of women cleaners in Pune for pending demands
प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांचे 'थाळी बजाव आंदोलन'

पुणे - महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी महिलांसाठी विमा योजना पुन्हा सुरू करावी. तसेच, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता द्यावा, विमा सरंक्षण द्यावे, घरटी कचरा गोळा करण्याचा दर काही महिन्यांसाठी वाढवावा, आदी प्रलंबित मागण्यांसाठी शहरातील महिला सफाई कर्मचाऱ्यांनी पुणे महापालिका भवनासमोर थाळी बजाव आंदोलन केले.

संपूर्ण पुणे शहरात तीन हजार पेक्षा जास्त महिला सफाई कर्मचारी दारोदारी जाऊन कचरा गोळा करतात. या महिलांना अत्यंत कमी मोबदला मिळतो. तसेच, कोणतीही विशेष आरोग्य सुरक्षा मिळत नसल्याने त्यांनी आज (मंगळवार) महापौर आणी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.

हेही वाचा - लॉकडाऊनदरम्यान मिठाई चक्क मोफत वाटली.. खराब झालेली फेकून दिली, मिठाई व्यावसायिकांनी व्यक्त केली भावना

कोरोना काळात कचरा उचलत असताना अनेकांना कोरोनाची लागण झाली. तरीही या कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ ठेवण्याचे काम केले आहे. कोरोनामुळे उत्पन्न घटले आहे. सेवाशुल्क निम्म्यावर आले आहे. कचऱ्यातून मिळणारे कागद, पत्रा, प्लास्टिक सारख्या वस्तू विकून काही हातभार लागायचा. परंतू, कचऱ्यातून या वस्तू गायब झाल्याने ते उत्पन्नही घटले आहे.

गेली 4 वर्ष कागदोपत्री अडकलेला विमा देण्यात यावा, अशी मागणीही या महिलांना कर्मचाऱ्यांनी केली आहे. अख्ख्या पुणे शहरात साडे आठ हजार महिला सफाई कर्मचारी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.