ETV Bharat / city

TET Paper Leak Case : 4.2 कोटींचा टीईटी पेपरफुटी घोटाळा, प्रत्येक विद्यार्थ्यांकडून घ्यायच्या 50 हजार ते 1 लाख रुपये - तुकाराम सुपेला अटक

टीईटी परीक्षेत कोट्यांवधींचा घोटाळा ( TET Exam Scam ) झाला असून पुणे पोलिसांनी या प्रकरणात 4 कोटी 20 लाख जप्त केले आहे.

TET Paper Leak Case
टीईटी पेपरफुटी घोटाळा
author img

By

Published : Dec 17, 2021, 3:40 PM IST

पुणे - आरोग्य भरतीच्या ( Arogya Bharti Paper Leak Case ) पेपरफुटी आणि मग म्हाडाच्या पेपरफुटीचा ( MHADA Paper Leak Case ) मास्टरमाईंड जी.ए टेक्निकल सॉफ्टवेअरचा संचालक डॉ. प्रिंतेश देशमुख याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराची झाडाझडती केल्यानंतर 2020ला झालेल्या टीईटी परीक्षेत देखील घोटाळा ( TET Paper Leak Case ) झाल्याचे उघड झाले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना ( Tukaram Supe Arrest ) आज सायबर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 88 लाखांचे रोकड जप्त करण्यात आले आहे. टीईटी परीक्षेत कोट्यांवधींचा घोटाळा झाला असून पुणे पोलिसांनी या प्रकरणात 4 कोटी 20 लाख जप्त केले आहे.

टीईटी परीक्षेत कोट्यांवधींचा घोटाळा
तुकाराम सुपेंकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त -टीईटी परीक्षांमध्ये गैरप्रकरणाच्या संदर्भात राज्य शासनाच्या परीक्षा विभागाकडून राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत लाज घेऊन विद्यार्थ्यांना पास केल्याचा आरोप तुकाराम सुपेवर आहे. या संपूर्ण घोटाळ्यात चार कोटी 20 लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांकडून 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत पैसे घेत होते. यातील तुकाराम सुपेंकडून तब्बल 88 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच सुपे यांच्याकडून 5 तोळे दागिने आणि 5 लाखाची एफडी असलेले कागदपत्रे सुद्धा सापडली आहेत.कोणाला किती मिळणार होते -या घोटाळ्यात विशेष म्हणजे जवळपास सव्वा चार कोटींच्या गैरव्यवहारात प्रत्येकाचा वाटा देखील ठरलेला होता. त्यानुसार आज तुकाराम सुपेकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपये मिळणार अशी डील झाली होती. तर यातील दुसरा एक आरोपी प्रितेश देशमुख याला देखील एक कोटी 25 लाख रुपये आणि अभिषेक सावरीकरला सुद्धा एक कोटी 25 लाख रुपये मिळतील, अशी डील झाली होती. यातील 80 लाखांची रोकड सुपेकडून जप्त करण्यात आली आहे.या पद्धतीने करण्यात आला गैर कारभार -2019 मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीनुसार 19 जानेवारी 2020 रोजी ही पात्रता परीक्षा जीएस सॉफ्टवेअरल कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीचा महाराष्ट्रातील संचालक प्रिंतेश देशमुख यांच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. याचाच फायदा घेत त्याने तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांना विश्वासात घेतले आणि वेगवेगळ्या एजंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पात्र करून देण्याच्या बदल्यात पैसे वसूल केले. यानंतर परीक्षा निकाल प्रक्रियेदरम्यान देखील फेरफार करून त्यांना पात्र करण्यात आले.

हेही वाचा - New TET Scam : टीईटीचा नवीन घोटाळा? म्हाडा पेपरफुटीचा सूत्रधार रितेश देशमुखच्या घरात सापडली टीईटीची पन्नास ओळखपत्रे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.