ETV Bharat / city

Sindhutai Sapkal passed away : अनाथांची माय काळाच्या पडद्याआड, दुपारी शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sakpal) यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याच्यांवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना एक महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

sindhutai sapkal
सिंधुताई सपकाळ
author img

By

Published : Jan 5, 2022, 1:10 AM IST

Updated : Jan 5, 2022, 3:50 PM IST

पुणे - अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal Passes Away) यांचं पुण्यात निधन झालं. त्या 74 वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं लार्ज फायटर हायटस हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं. या ऑपरेशननंतर त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याने त्यांची तब्येत खालावली होती. मंगळवारी (4 जानेवारी) अखेर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील ठोसर पागा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. पण त्याआधी पुण्यातील मांजरी येथील सन्मती बाल निकेतन संस्था येथे माईंचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.

डॉ. भूषण किनोळकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राजकीय, सामाजिक, कला आदी क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सिंधुताई सपकाळ यांचं पार्थिव आज सकाळी 8 वाजता मांजरी येथील बाल निकेतन सदन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 12 वाजता ठोसर पागेत महानुभाव पंथानुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सिंधुताई यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  • सिंधुताईंचा जीवनप्रवास -

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही सिंधुताई यांची जन्मभूमी. त्यांचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला होता. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली.

  • पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सिंधुताईंची म्हणाल्या...

पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आणि माझा सगळा भूतकाळ जिवंत झाला, हा पुरस्कार मिळणे हा चमत्कार आहे. हा मला मोठा सुखद धक्का आहे, अशी प्रतिक्रिया पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी दिली होती.

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यात अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना समाजकार्यात भरीव कामगिरी केल्याबद्दल मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. याबद्दल बोलताना सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, पुरस्कार जाहीर झाला आणि मला माझी मुले आठवायला लागली, मला पोटाची भूक आठवायला लागली, लेकरांचे तडफडणे आठवायला लागले. उघडी-नागडी लेकरं स्टेशनवर झोपलेले आठवायला लागले, स्मशानात खालेली भाकरी आठवायला लागली आणि माझा भूतकाळ झरकन डोळ्यासमोरून गेला.'

Last Updated : Jan 5, 2022, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.