ETV Bharat / city

धक्कादायक! वाहनाचा वेग कमी करताना दुचाकीला पाठीमागून कंटेनरची धडक; पुण्यात बापलेकीचा मृत्यू - धक्कादायक

पुण्यातील सासवड रोड सातववाडी रोडवर दुचाकीवरून मुलील शाळेत सोडवण्याकरिता निघालेल्या बाप-लेकीचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावरून जात असता नीलेश साळुंखे हे मुलगी मिनाक्षी साळुंखे हिला शाळेत सोडायला जात होते. त्यावेळी त्यांच्या पुढील दुचाकीस्वाराने गाडीवरून कचरा फेकला असता, त्याची येणारी धुळीपासून वाचवण्याकरिता नीलेश साळुंखे यांनी गाडी स्लो करताचा पाठीमागच्या कंटेनरने जोराची धडक दिली.

Road Accident
रोड अपघात
author img

By

Published : Jul 19, 2022, 1:46 PM IST

Updated : Jul 19, 2022, 2:21 PM IST

पुणे : पुण्यात एक धक्कादायक अपघाताची घटना घडली. पुण्यातील सासवड रोड सातववाडी येथे वडील दुचाकीवर मुलीला शाळेत सोडवण्यासाठी जात असताना कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रस्त्यावरून जात असताना पुढील दुचाकीस्वाराने रस्त्यावर कचरा फेकला असता, त्याची धूळ अंगावर उडू नये याकरिता गाडीचा वेग कमी करताच पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. यात बाप-लेकीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर शाळकरी मुलीला उपचारासाठी घेऊन जाताना तिचाही मृत्यू झाला आहे.

अंगावर कचरा येऊ नये म्हणून गाडीचा वेग केला कमी : हा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ग्लायडिंग सेंटरसमोर सातववाडी येथे झाला. नीलेश साळुंखे (वय ३५, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) मीनाक्षी साळुंखे (वय १०) अशी अपघातात मृत्यू झालेल्या बापलेकीची नावे आहेत. मीनाक्षी साळुंखे साधना विद्यालयामध्ये इयत्ता पाचवीमध्ये शिकत होती. आज सकाळी नीलेश जेव्हा आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाले तेव्हा सातववाडी येथे नीलेश यांच्या पुढे असलेल्या दुचाकीस्वाराने रस्त्याच्या कडेला कचरा फेकला आणि तो कचरा आपल्या अंगावर येऊ नये म्हणून नीलेश यांनी गाडी स्लो केली. पण, मागून भरधाव येणाऱ्या कंटेनरने त्यांना धडक दिल्याने नीलेश साळुंखे यांचा अपघात झाल्याने त्यांचे आणि त्यांच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला आहे.

वेगात येणाऱ्या कंटेनरने बापलेकीला दिली धडक : आपल्या मुलीला शाळेत सोडवण्यासाठी नीलेश साळुंखे फुरसुंगीहून हडपसरच्या दिशेने चालले होते. त्यावेळी सातववाडी येथे पाठीमागून आलेल्या ट्रकची धडक बसल्याने दुचाकीचालकाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी बाजूला फेकल्या गेलेल्या मुलीला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना तिचाही मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा : Fraud of women MLAs: धक्कादायक! भाजपच्या चार महिला आमदारांची फसवणूक; पुण्यात गुन्हा दाखल

Last Updated : Jul 19, 2022, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.