ETV Bharat / city

'शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी द्यावेत' - शिवसेना

उदयनराजे भोसले हे माजी खासदार आहेत पण ते आता साताऱ्याचे भाजप नेते आहेत. त्यांनी काय बोलावे हे त्यांनीच ठरवावे. मात्र, ते शिवरायांचे वंशज आहेत की नाही याचे पुरावे त्यांनी द्यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Jan 15, 2020, 2:07 PM IST

Updated : Jan 15, 2020, 5:08 PM IST

पुणे - शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची पुण्यात एक प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना राऊत यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरे दिली. तसेच अनेक मुद्द्यांनाही हात घातला. मुलाखती दरम्यान बोलताना, राऊत यांनी उदयनराजे यांच्याबाबत देखील अनेक वक्तव्ये केली. शिवसेना स्थापन करताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का ? असा प्रश्न मंगळवारी पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी विचारला होता. याला उत्तर देताना राऊत यांनी, शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी द्यावेत, असे म्हटले आहे.

पुणे येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रकट मुलाखत...

राऊतांचा उदयनराजेंना सवाल.. पुरावा दाखवा..

शिवसेना स्थापन करताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का, असा सवाल करत उदयनराजेंनी काल संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केली होती. यावर बोलताना राऊत यांनी, उदयनराजे भोसले हे माजी खासदार आहेत पण आता साताऱ्याचे भाजप नेते आहेत. त्यांनी काय बोलावे हे त्यांनी ठरवावे. मात्र, ते शिवरायांचे वंशज आहेत की नाही याचे पुरावे त्यांनी द्यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले.

राजा हा जनतेचे रक्षण करणारा लुटमार करणारा नव्हे...

राजा हा जनतेचे रक्षण करणारा असतो, लुटणारा नाही, असा टोलाही राऊत यांनी उदयनराजेंना लगावला आहे. तसेच शरद पवार यांना जाणता राजा बोलण्यावर त्यांनी सहमती दाखवली आहे. शरद पवार हे जाणता राजा असल्याचे राऊत म्हणाले.

हेही वाचा... 'शिवसेना सोयीनुसार भूमिका बदलत नाही; सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी याचे भान ठेवा'

काय म्हणाले संजय राऊत ?

  • महाविकास आघाडीचे हे सरकार बनवायचे आधीच ठरले होते,

हे सरकार बनवायचेे आधीच ठरले होते, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. भाजपसोबत निवडणूक लढवूनही शिवसेनेने भाजपसोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. यावर या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

  • शरद पवार यांच्यावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. आपल्याला एक आदर्श सरकार चालवायचे आहे, असे पवार म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यानुसार आम्ही जनतेसाठी काम करणार आहोत. अजित पवार हे स्टेपनी नसून या सरकारमधले एक चाक आहे, असेही ते म्हणाले.

  • भाजप शब्द पाळणार नाही याची खात्री होती

भाजप आम्हाला दिलेला शब्द पाळणार नाही, याची आम्हाला खात्री होती. सत्तेत येणे ही तीनही पक्षांची गरज होती. या माध्यमातून एक स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

  • काँग्रेसही हिंदुत्ववादी

शिवसेनेने आपली भुमिका सोडली का? यावर बोलताना राऊत यांनी काँग्रेस देखील हिंदुत्ववादी पक्ष असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी गुजरातला जातात, आपले गोत्र सांगतात. महात्मा गांधी, नेहरू कडवट हिंदुत्ववादी होते, याची आठवण राऊत यांनी करून दिली. शिवसेनेला याबाबतीत कोणी डिवचण्याचं काम करू नये. शिवसेना ही हिंदुत्ववादीच आहे. प्रत्येकाने आपापले विचार पाळावेत. सत्तेसाठी हिंदुत्व आम्ही सोडले नसल्याचेही राऊत म्हणाले.

Intro:Body:

'शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजेंनी द्यावेत'

मुंबई - उदयनराजे भोसले माजी खासदार आहेत. आता साताऱ्याचे भाजप नेते आहेत. त्यांनी काय बोलावं हे त्यांनी ठरवावं. मात्र ते शिवरायांचे वंशज आहेत की नाही याचे पुरावे त्यांनी द्यावे, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले. शिवसेना स्थापन करताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का, असा सवाल करत उदयनराजेंनी काल संजय राऊत आणि शिवसेनेवर टीका केली होती.  शरद पवार हे जाणता राजा असल्याचेही राऊत म्हणाले.

'हे सरकार बनवायचं आधीच ठरलं होतं'

हे सरकार बनवायचं आधीच ठरलं होतं, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केला. भाजपसोबत निवडणूक लढवूनही शिवसेनेनं भाजपसोबत न जाता काँग्रेस-राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन केली. यावर या कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे.

'शरद पवार यांच्यावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास'

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रचंड श्रद्धा आणि विश्वास आहे. आदर्श सरकार चालवायचं असं पवार म्हणालेत. त्यानुसार जनतेसाठी काम करणार आहोत. अजित पवार हे स्टेपनी नसून या सरकारमधलं एक चाक आहे, असे ते म्हणाले. भाजप दिलेला शब्द पाळणार नाही, याची आम्हाला खात्री होती. सत्तेत येणं ही तीनही पक्षांची गरज होती. या माध्यमातून एक स्थिर सरकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

दिल्लीहून आता फोन येईल आणि चित्र बदलेल का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आता वेळ निघून गेल्याचं ते म्हणाले. उदयनराजेंनी केलेल्या टीकेलाही राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.

'काँग्रेसही हिंदुत्ववादीच'

राहुल गांधी गुजरातला जातात, आपलं गोत्र सांगतात. महात्मा गांधी, नेहरू कडवट हिंदुत्ववादी होते. शिवसेनेला याबाबतीत कोणी डिवचण्याचं काम करू नये. शिवसेना ही हिंदुत्ववादीच आहे. प्रत्येकाने आपापले विचार पाळावेत. सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं नाही.

Conclusion:
Last Updated : Jan 15, 2020, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.