ETV Bharat / city

Sharad Pawar : एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेवरुन शरद पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'झेड सुरक्षा दिली होती...'

author img

By

Published : Jul 23, 2022, 2:51 PM IST

Sharad Pawar Vs Eknath Shinde: एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांना झेड सिक्युरिटी होती, आणि आहे. गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्याने त्यांना ऑडिशनल फोर्स देखील देण्यात आले होते.

शरद पवारांचे स्पष्टीकरण
शरद पवारांचे स्पष्टीकरण

पुणे - राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर नवनवीन राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या नक्षलवाद्यांकडून खून करण्याचा प्रयत्न होता. परंतु, त्यांनी सुरक्षा पुरवण्यात वर्षा बंगल्यावरुन नकार दिला, असा खळबळजनक आरोप नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी केला. त्यांच्या या आरोपाना दीपक केसकर, शुंभराज देसाई यांनीही दुजोरा दिला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( Sharad Pawar Vs Eknath Shinde ) ते म्हणाले की याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याशी मी चर्चा केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी होती. गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्याने त्यांना ऑडिशनल फोर्स देखील देण्यात आले होते. त्यामुळे यात अधिक काही चर्चा करण्याची गरज नाही, असे यावेळी पवार म्हणाले आहेत.

शरद पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते - ते म्हणाले की, मला वस्तुस्थिती माहीत नाही, पण शासनात अनेक वर्ष काम केल्यानंतर मला एक गोष्टीची माहिती आहे. सुरक्षा कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची याबाबत कोरम आहे. ते कॅबिनेट असत नाही. ही चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. ही चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव हे गृह सचिव डिजी अश्या सिनियर लोकाची एक कमेटी असते. यापुढे निर्णय आणि शिफारशी केल्या जातात. आणि मी याबाबत तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील ( Home Minister Dilip Walse-Patil ) यांच्याशी मी चर्चा केली होती. ते म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना झेड सिक्युरिटी होती. गडचिरोलीचं काम त्यांच्याकडे असल्याने त्यांना ऑडिशनल फोर्स देखील देण्यात आलं होतं. त्यामुळे यात अधिक काही चर्चा करण्याची गरज नाही, असे यावेळी पवार म्हणाले आहेत.

सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका - मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत पवार म्हणाले, की सबंध सरकार केंद्रित ठेवून दोघांनी चालवायची ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसते. त्याला त्यांच्या राज्याच्या सहकाऱ्यांची आणि केंद्रीय सहकाऱ्यांची आणि नेतृवाची सहमती आहे. ते सत्ताधारी आहे, ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावं लागेल, असे देखील यावेळी पवार म्हणाले आहेत.

मुलं बाळांच्या प्रतिक्रियावर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही - नितेश राणे यांच्या आरोपावर पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की मुलं बाळांच्या प्रतिक्रियावर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही, असा तिला देखील यावेळी पवार यांनी लगावला आहे.

हेही वाचा - Lingya Ghat in Pune Mulshi Taluka : लिंग्या घाटातील सुळक्यावर चढून पर्यटकांचा जीवघेणा फोटोशूट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.