ETV Bharat / city

Sanjay Jadhav PC : '...आणि परत म्हणायचं आम्हाला तिकीट दिल नाही', शिवसेना खासदार संजय जाधवांची संभाजीराजेंवर टीका - संभाजी राजे पत्रकार परिषद

संभाजी राजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati Press Conference ) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackery )  यांच्यावर गंभीर आरोप लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi Government ) मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी मोडला, असे ते म्हणाले. दरम्यान संभाजीराजेंच्या या आरोपानंतर शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव ( Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje ) यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje
Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje
author img

By

Published : May 27, 2022, 3:52 PM IST

पुणे - आज संभाजी राजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati Press Conference ) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackery ) यांच्यावर गंभीर आरोप लावले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi Government ) मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र, तो शब्द त्यांनी मोडला, असे ते म्हणाले. दरम्यान संभाजीराजेंच्या या आरोपानंतर शिवसेनेचे परभणीचे आमदार संजय जाधव ( Sanjay Jadhav Replied To Sambhaji Raje ) यांनी संभाजीराजेंवर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचा उमेदवार कोण असेल, ते शिवसेना ठरवेल. राजे काही शिवसेनेत नाही, असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया

काय म्हणाले संजय जाधव - शिवसेनेचा उमेदवार कोण असावा, हे शिवसेना ठरवेल. राजे हे काही शिवसेनेत नाही. त्यांनी शिवसेनेकडूनच का तिकीट मागावी ते ही अपक्ष? त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपकडे मागावी. तुम्ही 6 वर्ष भाजपचे खासदार होते. आत्ता शिवसेनेने तुम्हाला तिकीट का द्यावं? तरीही शिवसेनेने तुम्हाला प्रस्ताव दिला होता की शिवबंधन बांधा. पण तुम्ही तस केलं नाही. एकतर पक्षाचा स्वीकार करायचा नाही आणि परत म्हणायचा आम्हाला दिल नाही. याला अर्थ नाही, अशी टीका जाधव यांनी केली.

संभाजीराजेंनी केला होता आरोप - गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं होतं. शिवसेनेनं पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी अट घातल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी त्याला नकार दिला. आज सकाळी संभाजीराजेंनी पत्रकार परिषद घेत मी राज्यसभेची निवडणूक लढविणार नाही, असं जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, असा आरोपीदेखील त्यांनी केला.

हेही वाचा - Aryan Khan : आर्यन खानला कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीकडून क्लीन चिट..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.