ETV Bharat / city

ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Mar 23, 2021, 5:05 PM IST

उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणाऱ्या बाबा नीळकंठ कल्याणी यांना 2021 चा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केलेे आहे. पुण्यभूषण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी मंगळवारी हे पुरस्कार जाहीर केले.

ज्येष्ठ उद्योजक बाबा कल्याणी , पुण्यभूषण पुरस्कार
बाबा कल्याणी

पुणे - पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदाच्या वर्षी ज्येष्ठ उद्योगपती, भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा नीलकंठ कल्याणी यांना जाहीर झाला आहे.

उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार -

उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाने पुण्याचे नाव देशात, तसेच जगभर पोहोचविणाऱ्या बाबा नीळकंठ कल्याणी यांना 2021 चा पुण्यभूषण पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केलेे आहे. पुण्यभूषण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी मंगळवारी हे पुरस्कार जाहीर केले. या पुरस्काराचे यंदाचे 32 वे वर्ष असून पुण्यभूषण सोबतच, स्वातंत्र्य सैनिक आणि सीमेवर लढतांना जखमी झालेल्या काही जवानांनाही गौरवण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 2020 मध्येच ही निवड करण्यात आली होती, मात्र कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे गेल्या वर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता. आज मात्र पुरस्कार जाहीर करण्यात आला असून कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर हा पुरस्कार सोहळा होईल, असे जाहीर करण्यात आले.

हेही वाचा - मटा सन्मान २०२१ सोहळ्यात 'स्वराज्यजननी जिजामाता' मालिकेने ५ पारितोषिकांवर उमटवली मोहोर!

कल्याणी ग्रुप -

कल्याणी ग्रुपकडून सहा लांब आणि मध्यम टप्प्याच्या भारतीय सैन्यासाठी तोफा बनविण्यात येतात. याशिवाय विदेशातील ग्राहकांसाठी बंदुका तयार करण्यात येतात. सध्या तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. एखादे उत्पादनतयार करायला तुम्ही १० वर्षे घेवू शकत नाही. ते कालबाह्य होते, असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.