ETV Bharat / city

दौंड तालुक्यातील अवैध वाळू उपशावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

author img

By

Published : Jan 13, 2020, 9:12 AM IST

दौंड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपशावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एकूण 58 लाखांचा माल जप्त करण्यात आला. तसेच 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

Pune rural police action on illegal sand smugglers
अवैध वाळू उपस्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

पुणे - दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदी पात्रातून वाळू उपसण्याची परवानगी नसतानाही अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर बारामती क्राईम ब्रँचने कारवाई केली. या कारवाईत एकूण 58 लाख रुपयांचा माल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे. तसेच वाळू उपसा करणाऱ्या बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी 7 बोटी चालक आणि 7 मालक अशा एकूण 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

दौंड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपस्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई...

हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'

खानोटा येथे वाळूची तस्करी होत आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली. त्यांनी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना याबाबत सांगून या ठिकाणी छापा मारण्यास सांगितले. त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत खानोटा येथे जात पोलिसांनी अचानक छापा टाकला टाकला. या छाप्यात 7 फायबर बोटी आणि 8 लहान लोखंडी बोटी, वाळू काढण्याचे इंजन असा एकूण 58 लाख रुपयांचा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला.

हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

दौंड पोलीस स्टेशनमध्ये 7 बोटींचे चालक आणि मालक अशा एकूण 14 आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज हजरत शेख, रवसन हिजबुल शेख, बबलू मन्नान शेख, मोहम्मद नूर सलीम शेख, सराफत मुस्तफा शेख, संयुब नूरज शेख, मोहम्मद मद सबिक शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण झारखंडचे रहिवासी आहेत. तर संतोष बाळासाहेब भोसले, पप्पू कवडे, मारुती शिंदे, दत्ता गायकवाड, प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड, बाबू कुमार भोसले, शंकर कवडे अशी वाळू माफिया बोटी मालकांची नावे आहेत.

हेही वाचा... सीसीटीव्हीच्या आधारे दोन तासातच लागला चोरट्याचा शोध

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्यांचे सहकारी, आरसीपी पथकातील 14 पोलीस जवान यांनी केली. तसेच भिगवण पोलीस स्टेशन, दौंड पोलीस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्यांचेही यांत सहकार्य मिळाले. महसूल विभागातील मंडल अधिकारी मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दिपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेत दौंड पोलिसांच्या मदतीने सर्व बोटींचा स्फोटकांच्या सहाय्याने नाश केला आहे.

Intro:Body:दौड तालुक्यातील खानोटा येथे अवैध वाळू उपश्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई..

58 लाखांचा माल जप्त आणि नाश

14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, 7 अटकेत..

दौंड

दौंड तालुक्यातील खानोटा येथे भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसण्याची कोणतीही परवानगी नसताना अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर बारामती क्राईम ब्रँच आणि पोलिसांनी 58 लाख
रुपयेचा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे. बोटींचा जागीच नाश करण्यात आले आहे . 7 बोटींचे चालक आणि 7 मालक अशा 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या वाळूची तस्करी करत आहेत अशी माहिती माननीय श्री जयंत मीना सो. (आय पी एस ) अप्पर पोलीस अधीक्षक बारामती यांना बातमीदार मार्फत मिळाली असता त्यांनी बारामती क्राईम ब्रँच चे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सांगून त्यांना सदर ठिकाणी रेड करणे बाबत सांगितले असता त्यांनी त्या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन हद्दीत खानोटा येथे जाऊन माहिती घेऊन अचानक छापा टाकला टाकला . यावेळी 7 फायबर बोटी प्रत्येक बोटीची किंमत सहा लाख रुपये अशी एकूण 42,00,000 रुपये आणि 8 लहान लोखंडी बोटी त्यामध्ये वाळू काढण्याची इंजन त्याची प्रत्येकी किंमत दोन लाख रुपये अशी एकूण 16,00,000 रुपये असा एकूण 58,00,000 रुपयेचा मुद्देमाल भीमा नदीपात्रातून जप्त करण्यात आला आहे व ते जागीच नाश करण्यात आले आहे.

सदर कारवाई करण्यासाठी बारामती क्राईम ब्रँच च्या अधिकारी आणि जवान यांनी बोटीने नदीपात्रात जाऊन वाळूउपसा सुरू असलेल्या ठिकाणी छापा घातला आणि तात्काळ प्रत्येक बोटीत पोलीस जवान बसवून बोटी खानोटा गावच्या किनाऱ्यालगत आणल्या आणि बोटींचे ऑपरेटर यांना ताब्यात घेऊन धाडसी कारवाई केली आहे .दौंड पोलीस ठाण्यात 7 बोटींचे चालक आणि 7 मालक अशा 14 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी
1) अजीज हजरत शेख
2) रवसन हिजबुल शेख
3) बबलू मन्नान शेख
4) मोहम्मद नूर सलीम शेख
5) सराफत मुस्तफा शेख
6) संयुब नूरज शेख
7) मोहम्मद मद सबिक शेख
सर्व रा झारखंड

वाळू माफिया बोटीचे मालक खालील प्रमाणे
8) संतोष बाळासाहेब भोसले
9) पप्पू कवडे
10) मारुती शिंदे
11) दत्ता गायकवाड
12) प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड
13) बाबू कुमार भोसले
14) शंकर कवडे

ही कामगिरी पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक संदीप पाटील ,
अप्पर पोलीस, अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना (आयपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली
बारामती क्राईम ब्रँच चे
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव ,पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार , विशाल जावळे, अजिंक्य कदम, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच आरसीपी पथकातील 14 पोलिस जवान यांनी कामगिरी केली आहे.
तसेच

भिगवण पोलीसशन चे पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख पोलीस जवान संदीप कारंडे, पोमने, शिंदे,
दौड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस जवान मलगुंडे, काळे, दुधाळ, बोऱ्हाडे यांचे सहकार्य मिळाले

तसेच महसूल विभागातील मंडल अधिकारी मंगेश नेवसे आणि तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे, यादव कोतवाल अशोक भोसले यांनी कारवाईत सहभाग घेऊन दौड पोलिसांचे मदतीने सर्व बोटी स्फोटकांचे साहाय्याने नाश केल्या आहेत .अशी माहिती पोलिसांनी दिली आहे .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.