ETV Bharat / city

पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..? - पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात बंडखोरी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज (सोमवारी) शेवटचा दिवस आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोरी केलेले बंडखोर थंड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
author img

By

Published : Oct 7, 2019, 2:05 PM IST

पुणे - राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे माघारीनंतर प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस अशा सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात, 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?

पुणे शहरात शिवसेसेनेकडून तीन जणांनी बंड केले आहे. कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसमध्येही बंडखोरी झाली असून कमल व्यवहारे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा... 'बंड'खोर मागे हटणार का? उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

वडगावशेरी मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी भाजपकडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत. खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पर्वती मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होता, यामुळे काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोध बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा... 'आरे'तील वृक्षतोड म्हणजे हिटलरशाहीच; शिवसेनेचा 'सामना'तून सत्ताधाऱ्यांना टोला

पर्वतीतून भाजपकडून माधुरी मिसाळ निवडणूक लढवत आहेत. तर कॅन्टोमेन्ट मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसत आहे. या ठिकाणी भाजपकडून माजी नगरसेवक डॉ भरत वैरागे, काँग्रेसकडून माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, शिवसेनेकडून नगरसेविका पल्लवी जावळे यांनी बंडखोरी करत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपच्या सुनील कांबळे यांना आव्हान दिले आहे.

maharashtra vidhan sabha election 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

हेही वाचा... सर्वांनाच रडवणारा कांदा महाराष्ट्रालाही रडवणार का?​​​​​​​

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी झालेली दिसून येत आहे. इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आप्पा जगदाळे यांनी अपक्ष फॉर्म भरत पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे तर शिरूर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी झाली असून भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एकंदरीतच या बंडखोरांना शांत करण्यात राजकीय पक्षांना कितपत यश येते यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Intro:पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोरी, बंडखोर होणार का थंड याकडे लक्षBody:mh_pun_01_rebales_in_pune_wkt_7201348

anchor
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी चा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे माघारीनंतर प्रमुख लढती चित्र स्पष्ट होणार आहे पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यातल्या 21 विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी बंडखोरीची झालेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी तसेच काँग्रेस अशा सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र पुणे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे
पुणे शहरात शिवसेसेनेकडून तीन जणांनी बंड केले आहे.कसबा मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसमध्ये ही बंडखोरी झाली असून कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केलीय, कसब्यातून भाजपच्या मुक्ता टिळक तर काँग्रेस कडून अरविंद शिंदे निवडणूक लढवत आहेत
तर वडगावशेरी मतदारसंघातून शिवसेना नगरसेवक संजय भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.याठिकाणी भाजप कडून जगदीश मुळीक तर राष्ट्रवादी कडून सुनील टिंगरे निवडणूक लढवत आहेत. खडकवासला मतदारसंघातून शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे , पर्वती मतदारसंघातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होता यामध्ये काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अश्विनी कदम यांच्या विरोध बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पर्वतीतून भाजपकडून माधुरी मिसाळ निवडणूक लढवत आहेत.तर कॅन्टोमेन्ट मतदारसंघात सर्वच पक्षांना बंडखोरीची झळ बसली.या ठिकाणी भाजपकडून माजी नगरसेवक डॉ भरत वैरागे,काँग्रेसकडून माजी नगरसेवक सदानंद शेट्टी,शिवसेनेकडून नगरसेविका पल्लवी जावळे यांनी बंडखोरी करत काँग्रेसचे रमेश बागवे व भाजपच्या सुनील कांबळे यांना आव्हान दिल आहे. ग्रामीण भागातील मतदारसंघांमध्ये देखील बंडखोरी दिसून येते आहे इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आप्पा जगदाळे यांनी अपक्ष फॉर्म भरत पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंड पुकारले आहे तर शिरूर मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप कंद यांनी बंडखोरी केली आहे खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात भाजप मध्ये बंडखोरी झाली असून भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे एकंदरीतच या बंडखोरांना शांत करण्यात राजकीय पक्षांना कितपत येतं यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे....
wKt राहुल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.