पुणे - राज्यासह पुणे शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे वाढत असलेले रुग्ण तर दुसरीकडे कोरोनाचे देखील वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे शहरात आज 5480 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरात 10 दिवसात आढळले 36 हजार 465 रुग्ण -
पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणारे नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात 10 दिवसात 36 हजार 465 रुग्ण आढळून आले आहेत. आज अखेरीस शहरात 28 हजार 542 एवढे ऍक्टिव्ह रुग्ण झाले आहे.
हे ही वाचा -Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
शहरात आज 5,480 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -
पुणे शहरात आज 5,480 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 2,674 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. शहरात आज कोरोनाने एक मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही 28,542 एवढी झाली आहे.