ETV Bharat / technology

टेस्ला कंपनीची भारतात नोकर भरती सुरू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एलोन मस्क भेटीनंतर 13 जागांवर भरती - TESLA RECRUITMENT IN INDIA

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका भेटीदरम्यान एलोन मस्क यांची भेट घेतल्यानंतर इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लानं भारतातील विविध नोकर भरती प्रक्रिया सुरू केलीय.

Tesla
टेस्ला (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 18, 2025, 12:36 PM IST

Updated : Feb 18, 2025, 1:02 PM IST

हैदराबाद Tesla Recruitment : अमेरिकेची शक्तिशाली इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लानं भारतात नोकर भरती सुरू केली आहे. कंपनीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. कंपनीनं 13 वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना कंपनीनं सांगितलं की, या नोकऱ्या फ्रंटएंड आणि बॅकएंडसाठी आहेत. अलिकडेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर, एलोन मस्कची ईव्ही कंपनी टेस्लानं भरतीची माहिती शेअर केली आहे.

'या' पदांसाठी निघाली जाहिरात
लिंक्डइन या सोशल मीडिया पोस्टनुसार, टेस्लामध्ये 13 जागांची घोषणा करण्यात आली आहे. या 13 नोकऱ्यांपैकी 5 अशा नोकऱ्या आहेत ज्यांची जाहिरात ऑन-साईट नोकरीसाठी केली आहे. या नोकऱ्या मुंबई शहरांसाठी आहेत.

  • Service Advisor
  • Parts Advisor
  • Service Technician
  • Service Manager
  • Tesla Advisor
  • Store Manager
  • Business Operations Analyst
  • Customer Support Supervisor
  • Customer Support Specialist
  • Delivery Operations Specialist
  • Order Operations Specialist
  • Inside Sales Advisor
  • Consumer Engagement Manager

कसा करायचा अर्ज ?
तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्ही टेस्ला मोटर्सच्या लिंक्डइन पेजला भेट देऊन अर्ज करू शकता. या सर्व नोकऱ्यांची माहिती पेजवर दिली आहे. तुम्ही तिथं जाऊन नोकरीसाठी अर्ज करू शकता. आवश्यक पात्रतेची माहिती पोस्टमध्येच देण्यात आली आहे.

भारत टेस्लासाठी महत्वाची बाजारपेठ
या वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं लक्झरी वाहनांवरील सीमाशुल्क 110 टक्क्यांवरून 70 टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे. केंद्र सरकारनं केलेल्या बदलांनंतर, एलोन मस्कची टेस्ला कंपनी लवकरच भारतात येण्याची आशा बळावली आहे. टेस्लानं भारतात नोकरीच्या ऑफरसाठी जारी केलेली जाहिरात पाहूनही याचा अंदाज लावता येतो. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जक देश आहे. 2027 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचं लक्ष्य साध्य करण्यासाठी देश प्रयत्नशील आहे. याव्यतिरिक्त, इलेक्ट्रिक वाहनांना वाढत्या मागणीमुळं भारत टेस्लासाठी महत्वाची बाजारपेठ बणण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. ॲपलचा सर्वात परवडणारा iPhone SE 4 उद्या लाँच होणार?, कुठे पाहाल लाईव्ह इव्हेंट?
  2. दक्षिण कोरियानेही घातली डीपसीकवर बंदी
  3. Realme P3 मालिका थोड्याच वेळात होणार लॉंच, लाईव्ह स्ट्रीम कसं पहाणार?

Last Updated : Feb 18, 2025, 1:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.