पुणे - पुण्यातील वाहतूक कोंडी हे पुणे शहरातील अतिशय महत्त्वाची समस्या असून यावर मार्ग काढण्यासाठी नेहेमीच प्रयत्न केले जातात. पुण्यातील मुख्य पेठांमध्ये तर प्रचंड गर्दी मग ते तुळशीबाग असो की लक्ष्मी रोड. नेहमीच या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. पण आज याच रस्त्यावर याच पुणेकरांना फॉरेनची फिलिंग येत आहे.
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा -
पुण्यात आज पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शहरात पादचारी दिन आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा म्हणजेच लक्ष्मी रोड ओपन स्ट्रीट मॉल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक दरम्यान हा उपक्रम होणार असून त्यासाठी हा भाग वाहतूक तसेच पार्किंग साठी बंद आहे. आज लक्ष्मी रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध फुलांच्या कुंड्या,रस्त्याच्या मधोमध लावण्यात आलेल्या खुर्च्या याचा एक वेगळाच आनंद पुणेकर घेत आहे.
लक्ष्मी रस्त्यावर पुणेकरांना वेगळाच आनंद -
सार्वजनिक वाहतुकीमध्ये पादचारी हा महत्त्वाचा घटक आहे. शहरात अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन नुसार तसेच नॉन मोटराईज वाहतूक समितीचे पादचारी धोरण राबविले जात आहे.मात्र पादचारी दिन आयोजित केला जात नाही. त्यामुळे पाचारी दिन साजरा करण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांच्या माध्यमातून होत होती. त्यानुसार महानगरपालिकेने हा उपक्रम राबविला आहे. उपक्रमाच्या नियोजनासाठी विविध संस्थांचे प्रतिनिधी पोलीस अधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी हे देखील या वॉकिंग प्लाझा दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रोड वर उपलब्ध आहे.त्याच पद्धतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिक असल्याने एक वेगळाच आनंद पुणेकरांना घेता येत आहे.
येणाऱ्या काळात देखील अशाच पद्धतीने असे उपक्रम राबविण्यात यावे -
पुण्यात आज लक्ष्मी रोडवर वॉकिंग प्लाझा हा दिन साजरा करण्यात येत असल्याने पुणेकरांना एक दिवस का होईना पण त्यांना आन फॉरेन चा फिलिंग येत आहे.रस्त्यांच्या मधोमध लहान मुलांना खेळण्यासाठी लुडो..मधोमध नागरिकांची रेलचेल आणि त्यात रस्त्याच्या बाजूला फेरीवाले याचा आनंद पुणेकर घेत आहे. मात्र हा उपक्रम एक दिवसीय नसून येणाऱ्या काळात देखील अशाच पद्धतीने असे उपक्रम राबविण्यात यावे अशी इच्छा पुणेकरांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Farmers strike suspend: 'शेतकरी विजय दिवस', सरकारच्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांची 'घर वापसी'