पुणे: पुणे पोलिसांकडून दर महिन्याला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला बक्षीस दिले जातात. पण, आता हेच बक्षीस सध्या चर्चेचा विषय बनले ( Pune Police Personnel Reward List) आहेत. पुण्यातील गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून दिवस-रात्र पोलिसांकडून मेहनत घेतली जाते. मात्र आरोपींना अटक करणे, आरोपींना शोधणे, विविध गुन्ह्याचा तपास लावणे यासाठी फक्त शंभर रुपये बक्षीस दिले गेले आहे. तर वरिष्ठांना घरून पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशन वरून पोलीस आयुक्त कार्यालयात (Police Commissioner Office Pune) ने-आन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 हजार रुपयांचे बक्षीस पोलीस उप आयुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी त्याच कर्मचाऱ्यांना जाहीर केलेत. त्यामुळे आत्ता हे बक्षीस चर्चेचा विषय ठरत आहे.
रिवार्ड यादी व्हायरल- ज्या पोलिसांना हे रिवॅार्ड जाहीर झालेत त्याची कारणं फार इंटरेस्टिंग आहेत. तर दुसरीकडे या रिवॅार्डच्या रकमेचीही चर्चा होऊ लागलीय. पोलीस आयुक्तालयाकडून अगदी 100 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम कामगिरीनुसार रीवर्ड म्हणून देण्यात येते. नुकतंच पुणे पोलिसांच्या उत्तम कामगिरीसाठी पोलिस आयुक्तांकडून देण्यात येणारे रिवॅार्ड जाहीर करण्यात आले आहेत. सध्या परिमंडळ-३च्या आयुक्तांनी दिलेल्या रिवॅार्डची एक यादीच सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
जीवावर उदार अन, 100 रुपये रिवार्ड- परिमंडळ तीनच्या उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे ड्रायव्हर आणि गार्ड म्हणून नियुक्त असलेल्या चार पोलिस शिपायांना तब्बल २१ हजार रुपये प्रत्येकी रिवॅार्ड देण्यात आले आहेत. त्यांची उत्तम कामगिरी म्हणजे मॅडमला वेळेत पोलिस आयुक्तालयात बैठकीसाठी पोहोचवले. मीटिंग होईल तेव्हा वेळेत मीटिंगमध्ये पोहचविल म्हणून हजारो रूपयांची बक्षीस जाहीर झालीत. तर दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी मात्र गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगाराला जीवावर उदार होऊन पकडून आणणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केवळ १०० रुपयांचे बक्षीस दिले जात आहेत. त्यामुळे ही गोष्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.