ETV Bharat / city

'त्याचा' गेम करण्यासाठी पिस्तूल आवश्यक असल्याने त्याने फोडले एटीएम! - sangvi Police

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेचे एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना जुनी सांगवी परिसरात घडली होती. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास दरोडाविरोधी पथक देखील करत होते.

सांगवी एटीएम
सांगवी एटीएम
author img

By

Published : Aug 18, 2021, 4:06 PM IST

Updated : Aug 18, 2021, 6:49 PM IST

पिंपरी-चिंचवड - एटीएम फोडून पैसे मिळवून त्यातून पिस्तूल खरेदी करायचे आणि मारहाण करणाऱ्या तरुणाचा गेम करायचा, असा प्लॅन करणाऱ्या तरुणाला पिंपरी-चिंचवडच्या दरोडाविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, एटीएम फोडण्याचा आरोपीचा प्रयत्न फसला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशाल दत्तू कांबळे असे आरोपीचे नाव आहे. तो मूळ कर्नाटकचा आहे.

पोलिसांनी तपासले सीसीटीव्ही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिस बँकेचे एटीएमची तोडफोड करून पैसे चोरण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना जुनी सांगवी परिसरात घडली होती. त्याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास दरोडाविरोधी पथक देखील करत होते. त्यांनी घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यामधून आरोपीची ओळख पटली. तो जुनी सांगवी या परिसरातील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.

एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वाद

आरोपीला मागील आठवड्यामध्ये सांगवी परिसरामध्ये एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून एका मुलाने मारहाण केली होती. त्याचा राग त्याच्या मनामध्ये असल्याने त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने मारहाण केलेल्या मुलाचा गेम करण्यासाठी पिस्तुलाची आवश्यकता होती. पिस्तूल आणण्यासाठी एटीएम फोडून पैसे मिळतील व त्या पैशातून पिस्तूल खरेदी करून मारहाण करणाऱ्या मुलाला काही अंतरावरून गोळी मारायची होती, असा त्याचा प्लॅन होता. म्हणून त्याने एटीएम फोडले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

दरोडाविरोधी पथकाची कामगिरी

ही कामगिरी दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे तसेच पोलीस अंमलदार राजेश कौशल्ये, उमेश पुलगम, सागर शेडगे, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, प्रवीण कांबळे, प्रविण माने, आशिष बनकर, नितीन लोखंडे, गणेश कोकणे व चिंतामण सुपे यांच्या पथकाने केली आहे.

Last Updated : Aug 18, 2021, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.