ETV Bharat / city

Pune Police Action : हातात कोयते घेऊन टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड; गुन्हेगारांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - पुण्यात वाहनांची तोडफोड

चतुश्रृंगी परिसरात काही टवाळखोरांनी हातात कोयते, लाकडी दांडके घेऊन गाड्यांची शुक्रवारी तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला होता, मात्र आरोपींचा सुगावा लागत नव्हता. अखेर पोलिसांनी या कुख्यात टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Police Arrested Accused
पुणे पोलिसांनी अटक केलेले आरोपी
author img

By

Published : May 10, 2022, 1:58 PM IST

पुणे - हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या टवाळखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही घटना पुण्यातील समर्थ परिसरात शुक्रवारी घडली होती. समर्थ पोलिसांनी याप्रकरणी चार कुख्यात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुभम शिवाजी खंडागळे, विनायक गणेश कापडे, यश दत्ता हेळेकर, साईनाथ विठ्ठल पाटोळे, अशी अटक केलेल्या कुख्यात आरोपींची नावे आहेत. या चारही सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

हातात कोयते, लाकडी दांडके घेऊन पसरवली दहशत - चतुश्रृंगी परिसरात काही टवाळखोरांनी हातात कोयते, लाकडी दांडके घेऊन गाड्यांची शुक्रवारी तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला होता, मात्र आरोपींचा सुगावा लागत नव्हता. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करत तांत्रिक मदत घेत आरोपींची ओळख पटवली. मात्र आरोपी फरार झाले होते.

गाडीवरुन पोलिसांनी काढला गुन्हेगारांचा माग - दहशत पसरवणाऱ्या आरोपींच्या शोधात असताना पोलिसांना खबऱ्याने या आरोपींबाबत माहिती दिली. मात्र आरोपींना पोलीस आपला शोध घेत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी आपला ठिकाणा बदलून चारचाकीतून पसार झाले. समर्थ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेतील तपास अधिकाऱ्यांनी आरोपी पसार झालेल्या चारचाकी वाहनाचा नंबर मिळवला. त्यानंबरवरुन गाडी मालकाचा शोध घेतला. त्यानंतर गाडी वापरणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळवली. अखेर समर्थ पोलिसांनी या प्रकरणातील चार कुख्यात आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.