पुणे - पुणे शहरातील गणेशोत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक मंडळे आणि घरोघरी विविध विषयांवर देखावे सादर केले जातात. मात्र, गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साधेपणाने गणेशोत्सव साजरे करत आहे. पुण्यात अनेक मंदिरांची प्रतिकृती तसेच समाजातील विविध विषयांवर देखावे सादर केले जातात. पुण्यातील कोथरूड भागात राहणाऱ्या सुधीर फडके परिवाराच्या वतीने यंदा पुणेकरांच जिव्हाळ्याचा विषय असलेला पुणेरी मेट्रो हा देखावा बनवला आहे.
पुण्यातील फडके परिवाराने साकारला पुणेरी मेट्रोचा देखावा - ganeshotsav 2021
पुण्यातील कोथरूड भागात राहणाऱ्या सुधीर फडके परिवाराच्या वतीने पुणेरी मेट्रो हा देखावा बनवला आहे. यासाठी पहिले डिझाईन बनवण्यात आले. त्यानंतर वुड, विविध कलर, हॅण्डशीट,आणि झाडे वापरून हुबेहूब अशी मेट्रोचा देखावा साकारण्यात आला आहे.