पुणे - याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. २२ तारखेला एकनाथ शिंदे, सुनील प्रभू, उद्धव ठाकरे इत्यादींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विविध याचिकांसह ही याचिका देखील सुनावणीसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबतीत ईटीव्ही भारतने कायदा अभ्यासक असीम सरोदे यांच्याशी सविस्तर संवाद साधला आहे.
जबाबदारी पाळतांना राजकीय नेते दिसत नाहीत यामध्ये, सध्या राज्यात राजकीय मंडळी ही जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्याही पक्षात जातात हे स्थिर प्रशासनाच्या संकल्पनेला धोकादायक आहे. त्यामुळे मतदारांची होणारी फसवणूक व मतदारांचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयाने ऐकून घ्यावे हा या हस्तक्षेप याचिका करण्यामागे उद्देश असल्याचे यावेळी सरोदे यांनी म्हटले आहे. भारतीय लोकशाहीची मुलभूत रचना व मतदारांनी केलेल्या मतदानाचा सन्मान करण्याची जबाबदारी पाळतांना राजकीय नेते दिसत नाहीत. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारणे व पैशांच्या लोभासाठी राजकीय नेत्यांनी सत्ताकांक्षी बनणे यातून नागरिकांसाठी दुखःद वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे आम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केली असही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - Sentenced To Death, १५ आरोपींना फाशीची शिक्षा, मध्यवर्ती कारागृहात केली होती कैद्याची हत्या