पुणे - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. (Padma Awards 2022) यामध्ये 128 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील दहा जणांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील कला क्षेत्रातून (Senior singer Prabha Atre) ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचा पद्मविभूषण पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. (Padma Vibhushan Award 2022 ) प्रभा अत्रे यांचा एकमेव पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. दरम्यान, हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी संवाद साधला आहे.
हिंदुस्तानी शैलीतील संगीताचे शिक्षण घेतले
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना 2022 पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यातील बाबासाहेब व इंदिराबाई अत्रे यांच्या कुटुंबात झाला आहे. प्रभाताईंच्या आई इंदिराबाई यासुद्धा गायिका होत्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच प्रभा अत्रे यांनी वयाच्या आठव्या वर्षीच शास्त्रीय संगीत शिकण्याची सुरुवात केली होती. पं. सुरेशबाबू माने व श्रीमती हिराबाई बडोदेकर यांच्याकडे पारंपारिक हिंदुस्तानी शैलीतील संगीताचे शिक्षण घेतले.
विज्ञान व कायदा विषयांत पदवी
हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना विविध कार्यक्रमांमध्ये साथ करत असे. प्रभा अत्रे यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून संगीत अलंकार ही पदवी आणि सरगम संशोधना बद्दल ट्रिनिटी म्युझिक कॉलेज, लंडन येथून डॉक्टरेट ऑफ म्युझिक पदवी मिळाली आहे. प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली आहे.
मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली
डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पुस्तक 'स्वरमयी' असून या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. प्रभाजींना यांना पद्मविभूषण पुरस्कार आधी 1990 साली पद्मश्री पुरस्कार व 2002 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर, नोबेलसाठीही झाले होते नामांकन