पुणे :- राज्य घटनेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम आहेत. अनेक शिक्षण संस्थांनी वेगवेगळे नियम लावले आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने काय करू नये, काय करावं यावर चर्चा होऊ शकते. समाजातील तरुणांचा गट एका मुलीचा पाठलाग करतात. आणि हिजाब का घातला असे बोलत असल्यास अशी गुंड प्रवुत्ती थांबायला हवी, असेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
देश हा घटनेने चालत असून मुलीने काय पेहेराव करावा यासाठीचा त्याला अधिकार आहे. मुलींच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू नये, असेही गोऱ्हे म्हणाल्या. हिजाब प्रकरणावर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहे. विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं आहे.
पुणे विद्यापीठात फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ऑनलाईन सहभागी झाले होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपसभापती नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सुनेत्रा पवार,विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर,प्र कुलगुरू डॉ.एस.एन.उमराणी आदी उपस्थित होते.
सुरक्षित कँपस मोहीम
आज व्हॅलेंटाईन डे निमित्त सुरक्षित कॅम्पस ही मोहीम राबिविण्यात येत आहे. ज्या माणसाला जसे व्यक्त व्हायचे असल्यास व्यक्त व्हावं. पण कोणीही स्वतःची इच्छा लादू नये. एकतर्फी प्रेमातून होणारी हिंसा घडू नये. सेंफ कॅम्पसच्या दृष्टीने कोणालाही त्रास होऊ नये, हे यामागील हे उद्दिष्ट असल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हेही वाचा - Hijab controversy : आमच्यासाठी हिजाबपेक्षा देशातील युवकांचा रोजगार महत्त्वाचा; नाना पटोलेंनी स्पष्ट केली भूमिका