ETV Bharat / city

Pune Murder Cases : पुण्यात खुनाच्या घटना वाढल्या; एका वर्षात चक्क 'एवढे' झाले खून - Murder incidents increased in Pune

पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. चोरी, दरोडे तसेच घरफोड्या यासोबतच पुण्यात खुनांचे प्रमाण देखील ( Pune Murder Cases ) अधिकच वाढताना दिसत आहे.

Pune Murder Cases
पुण्यात खुनाच्या घटना वाढल्या
author img

By

Published : Jan 18, 2022, 4:52 PM IST

पुणे - पुण्यात गुन्ह्यांचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. चोरी, दरोडे तसेच घरफोड्या यासोबतच पुण्यात खुनांचे ( Pune Murder Cases ) प्रमाण देखील अधिकच वाढताना दिसत आहे.

2020 च्या तुलतेन 21 मध्ये पुण्यात खुनाच्या घटना वाढल्या -

पुणे शहरात गेल्या वर्षी खुणाच्या तब्बल 100 घटना घडल्या आहेत. यातील 96 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश देखील आले आहे. तुलनेत 2020 यावर्षी शहरात एकूण 77 खुनाच्या घटना घडल्या होत्या. त्यातुलनेने यावर्षी 100 खून झाल्याचे उघडकीस आले आहे.

60हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई -

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी मोक्का कारवाई सुरू केली. या माध्यमातून त्यांनी 60हून अधिक गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली. तर एमपीडीए नुसार अनेक सराईत गुन्हेगारांना तुरुंगात धाडले आहे. परंतु असं असलं तरीही पुणे शहरात गेल्या वर्षी खुणाच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये कौटुंबिक वाद, पूर्ववैमनस्यातून आणि किरकोळ वादातून सर्वाधिक खून झाले आहे.

2019 मध्ये घडलेल्या घटना -

2019 मध्ये पुणे शहरात खुनाच्या 74 घटना घडल्या होत्या. त्यातील 70 गुन्हे उघडकीस आले होते. तर 2020 मध्ये खुनाच्या 77 घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे लॉकडाऊन असतानाही हे खून झाले होते. यातील 71 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते. तर 2021 मध्ये तब्बल शंभर खुनाचे प्रकार उघडकीस आले. त्यातील 96 घटना उघडकीस आले आहेत. तर चार खुनाच्या घटनेचे गूढ अजूनही उकलले नाही.

हेही वाचा - Accidental Black Spot Pune : पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले; शहरात 19 जीवघेणे 'ब्लॅक स्पॉट'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.