ETV Bharat / city

Mother Day : लेकरांच्या उज्वल भविष्यासाठी मातेची धडपड; रिक्षा चालवून करते उदरनिर्वाह - पुण्यात महिला चालवते रिक्षा

जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने काहीही शक्य नाही.हे वारंवार ऐकत असाल तरी त्याची प्रचिती विविध माध्यमातून येतच असते. आजच्या महिलांनी मग ते शहरातील असो की ग्रामीण भागातील चूल ते विविध क्षेत्रापर्यंत आज आपला ठसा उमटवत असतात. अशीच एक पुण्यातील महिला जी स्वतःच्या हिमतीच्या जोरावर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय (Woman Auto Driver in Pune) करून आपले घर चालवत आहे.

Women drive auto
तारा शेंडगे - महिला रिक्षा चालक
author img

By

Published : May 8, 2022, 6:03 AM IST

पुणे - जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्याने काहीही शक्य नाही.हे वारंवार ऐकत असाल तरी त्याची प्रचिती विविध माध्यमातून येतच असते. आजच्या महिलांनी मग ते शहरातील असो की ग्रामीण भागातील चूल ते विविध क्षेत्रापर्यंत आज आपला ठसा उमटवत असतात. अशीच एक पुण्यातील महिला जी स्वतःच्या हिमतीच्या जोरावर रिक्षा चालवण्याचा व्यवसाय (Woman Auto Driver in Pune) करून आपले घर चालवत आहे. तारा शेंडगे असे त्या महिलेचे नाव आहे. मुलाबाळांच्या चांगल्या भविष्यासाठी ही माता रिक्षा चालवते. तारा यांच्यावर दोन मुलांची जबाबदारी असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या अंगावर आहे. मुलीला फोटोग्राफीत आणि मुलाला इंजिनियर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आज, 8 मे ला मातृदिन (Mothers Day) साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने हा विशेष आढावा...

तारा शेंडगे - महिला रिक्षा चालक

अनेक संकटांना दिले तोंड - मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या तारा शेंडगे या अनेक वर्षणापासून पुण्यात स्थायिक आहेत. शिक्षण आठवीपर्यंत झालेलं. आपल्याला काय करता येईल याच्याच विचारात त्या होत्या. अंगावर मुलांची जबाबदारी. या जबाबदाऱ्यांना कस तोंड द्यावं असा प्रश्न त्यांच्यासमोर असायचा. मात्र त्यांना आपण स्वतः काही तरी करावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. त्यांनी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःजवळ एक पैसाही नसताना त्यांनी अनेक संकटावर मात करत रिक्षाचा व्यवसाय करणे पसंद केले. स्वतः कर्ज काढून रिक्षा खरेदी केली आणि आज दिवसातले 12 तास त्या रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करण्याचे काम करतात.

मुलाबाळांच्या भविष्यासाठी धडपड - तारा यांच्यावर दोन मुलांची जबाबदारी असून, त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या अंगावर आहे. मुलीला फोटोग्राफीत आणि मुलाला इंजिनियर करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. गेल्या दीड वर्षापासून त्या रिक्षा चालवण्याचे काम करत आहेत. त्यातून त्यांच्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचे काम त्या करत आहेत. स्वतःची जिद्द आणि मनात काम करण्याची इच्छा या जोरावर त्या आज पुण्यात स्वतःची रिक्षा घेऊन व्यवसाय करत असून, यशस्वी महिला रिक्षा चालक म्हणून त्या परिचित आहेत. आज महिलांनी पुढे यायला हवे, प्रत्येक क्षेत्रात काहीतही करता येऊ शकते आणि ते शक्य असल्याचे देखील यावेळी तारा शेंडगे म्हणतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.