ETV Bharat / city

World Mental Health Day : तरुण मानसिक आजाराच्या विळख्यात; देशात ६.५ टक्के लोक मानसिक आजाराने ग्रस्त - World Mental Health Day

10 ऑक्टोबर रोजी जगभरात जागतिक मेंटल हेल्थ डे ( World Mental Health Day ) साजरा केला जातो. बरीच तरुण मानसिक तणाव, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबिया यासारख्या मानसिक आजाराचा बळी ( Young victims of mental illness ) ठरतात. जागतिक मानसिक आरोग्य दिवस ( World Mental Health Day ) हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो.

World Mental Health Day
जागतिक मेंटल हेल्थ डे
author img

By

Published : Oct 9, 2022, 10:02 PM IST

पुणे:- 10 ऑक्टोबरला सर्वत्र जागतिक मेंटल हेल्थ डे ( World Mental Health Day ) साजरा केला जातो. प्रत्येकजण मानसिक दबावातून ( mental stress ) जात आहे. पण फार कमी लोक त्याला महत्त्व देतात. या अज्ञानामुळे तो मानसिक तणाव, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबिया यासारख्या मानसिक आजाराचा बळी ( Young victims of mental illness ) ठरतो. जागतिक मानसिक आरोग्य दिवस ( World Mental Health Day ) हा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर रोजी जगभरात मानसिक आरोग्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी साजरा केला जातो. लोकांमध्ये मानसिक समस्यांविषयी जागरूकता पसरवणे हा त्याचा हेतू आहे. जागतिक मेंटल हेल्थ डे च्या निमित्ताने पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच इतिहास काय आहे. कशा पद्धतीने इथ उपचार दिले जातात.हे जाणून घेऊया....

जागतिक मेंटल हेल्थ डे

काय आहे इतिहास... प्रादेशिक मनोरुग्णाया हे सुरवातीला 1907 साली कुलाब्यात सुरू करण्यात आलं होत.तेव्हा त्याची बेडची व्यवस्था ही 700 होती.त्यानंतर 1915 नंतर हे रुग्णालय एका विशेष गाडीने पुण्यातील येरवडा येथे हलविण्यात आल. हे रुग्णालय या परिसरात 85 एकर मध्ये पसरलेला आहे. ज्यात रुग्णालय,विविध विभाग, कॉटर,अशी विभागणी करण्यात आली आहे. सुरवातीला ब्रिटिशांच्या काळात जेव्हा हे रुग्णालय इथ आलं तेव्हा याच नाव रुग्णालय नव्हत. तर मनोरुग्णांसाठी असायलंम होत. शहरातील अशी जागा जिथं हे लोक व्यवस्थितपणे राहू शकता. यांच्यामुळे कोणालाही त्रास नको म्हणून हे रुग्णालय असायलंम नावाने ओळखलं जाऊ लागत होत. त्यानंतर जस जस सुधारणा होत गेल्या तसं तस याच स्वरूप, नाव बदलत गेलं. नंतर प्रादेशिक मनोरुग्णालय अस नाव झाल. आत्ता अंतरुग्नांसाठी 2 हजार 540 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.अशी माहिती व्यवसायिक उपचार तज्ञ डॉ.स्नेहल सहस्त्रकर यांनी यावेळी दिली.

Treatment of psychiatric patients in regional hospitals
प्रादेशिक रुग्णालयात मनोरुग्णांवर उपचार

मानसिक रुग्ण संख्येत वाढ - पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालया बेडची क्षमता ही 2 हजार 540 असून सध्या पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 1 हजार 180 रुग्ण हे ऍडमिट आहे. त्यात 667 रुग्ण पुरुष आहे तर 513 रुग्ण या महिला आहेत. या रुग्णांना दरोरोज औषधोपचार तसेच त्यांना औषधोपचार बरोबरच विविध प्रशिक्षण,तसेच विविध शिबिर घेतले जातात. तसेच डॉक्टरांकडून दरोरोज तपासणी केली जाते. पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात 954 कर्मचारी असून त्यातील 650 पदे ही भरलेली असून बाकीचं रिक्त पदे आहेत. राज्यात एकूणच मानसिक रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना काळात बेरोजगारी, आजारपणातून मानसिक आधाराची गरज असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. सध्या रुग्णालयात सॅक्रेटरीसची जागा कमी असून ती भरली गेली पाहिजे. अंतरुग्ण, बाह्यरुग्ण रुग्ण असे दोन्ही विभागाच्या माध्यमांतून रुग्णांवर उपचार केले जातात. बाह्यरुग्णमध्ये रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिलं जातं. दरोरोज जवळजवळ 100 बाह्यरुग्णांची तपासणी केली जाते.अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ लता पांढरे यांनी दिली.

patient in  hospital
रुग्णालयातील पेशंट

कोविडनंतर मनोरुग्णात वाढ - सध्या गेल्या काही वर्षांपासून मनोरुग्णांचा प्रमाण हा वाढत चालला आहे.यातील पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती झाली आहे. मुख्य बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून बदलेली जीवनशैली यामुळे मोठ्या प्रमाणात मानसिक ताण वाढला आहे. तसेच गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या आजाराने जे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान बदलले आहे.आर्थिक नुकसान,घरातील व्यक्तींचा मृत्यू,यामुळे मानसिक ताण आल्याने कोरोना नंतर मनोरुग्णांचे प्रमाण हे वाढले आहे.अशी माहिती यावेळी सॅक्रेटरीस डॉ. हरीनाक्षी गोसावी यांनी दिली.

Regional Psychiatric Hospital Pune
प्रादेशीक मनोरुग्णालय पुणे

तरुणचे प्रमाण अधिक - व्यसनमुळे देखील मनोरुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून येत आहे.यात प्रामुख्याने तरुण वयोगटातील मोठी संख्या आहे. जे याआधी आठळून येत नव्हती. यात विशेष म्हणजे दारू,व्हाईटनर ,गांजा, इलेनेशन, फेव्ही बाँड, ओपीडीमध्ये मोबाईल एडिशनचे प्रमाण देखील वाढलेले पाहायला मिळत आहे.अस देखील यावेळी डॉ.गोसावी यांनी सांगितल.

World Mental Health Day
पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णाल

रुग्णांचे पुनर्वसन - गेल्या तीन वर्षापासून पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात जे रुग्ण बरे झाले आहेत.ज्यांना घरचे लोक स्वीकारत नाहीये.अशा रुग्णांचा पुनर्वसन करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. रुग्णालयात हाफ वे होम नावाची संकल्पना राबविण्यात येत आहे. यात कौटुंबिक पुनर्वसन 68 रुग्णांचा करण्यात आला आहे.10 रुग्णांचा सामाजिक पुनर्वसन करण्यात आला आहे. एनजीओच्या मार्फत 13 रुग्णांचा पुनर्वसन करण्यात आला आहे. तर काही लोक हे स्वतः हा पुनर्वसन होऊन आज कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आहे.अशी माहिती यावेळी डॉ.गीता कुलकर्णी यांनी दिली.

विविध उपाययोजना सुरू - पुण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांना औषध उपचारांबरोबर विविध सोयी सुविधा देखील दिल्या जात आहे यात प्रामुख्याने म्युझिक थेरेपी तसेच व्यवसायिक शिबिर यांचा समावेश आहे. दिवसभरातील दिनचर्यांमध्ये रुग्णांना मानसिक दृष्टिकोन बदलावा यासाठी विविध सण उत्सवांमध्ये साहित्य बनवणे शिवणकाम फाइल्स बनवणे याचबरोबर महिलांमध्ये देखील विविध उपाय योजना केल्या जात आहे यामुळे या मनोरुग्णांमधील दृष्टीकोन बदलण्यास मदत होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.