ETV Bharat / city

मोदी सरकारचे नवे मंत्रालय सहकार क्षेत्र वाचवण्यासाठी उपयुक्त- हर्षवर्धन पाटील - माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.

हर्षवर्धन पाटील
हर्षवर्धन पाटील
author img

By

Published : Jul 8, 2021, 8:55 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालयाची निर्मिती केली असून त्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविली आहे. त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र वाचविण्यासाठी आणि त्यावर अवलंबून असलेल्या सामान्य लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.

'अमित शाहांच्या समर्थ नेतृत्वावर जबाबदारी'

पाटील म्हणाले की, मोदी सरकारने मंगळवारी नव्या सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्याचा निर्णय जाहीर केला तर बुधवारच्या मंत्रिमंडळ फेरबदलात या नव्या मंत्रालयाची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थ नेतृत्वावर सोपविली आहे. नवे मंत्रालय हे सहकार क्षेत्रासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस-व्यवसाय सुलभता निर्माण करण्यास आणि मल्टीस्टेट सहकारी संस्थांसाठी उपयुक्त ठरेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. सहकार क्षेत्राला सध्या फार मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत असून या क्षेत्रालाही व्यवसाय सुलभता मिळण्याची गरज आहे, यावर मोदी सरकारने भर दिला हे महत्त्वाचे आहे.

'सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल'

हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील सहकार क्षेत्राला केंद्र सरकारच्या धोरणांचे आणि कायद्यांचे पाठबळ मिळेल. त्यामुळे या क्षेत्राला आर्थिक शिस्त निर्माण करण्यास आणि सध्याच्या आव्हानांवर मात करण्यास मदत होईल. सहकार क्षेत्रावर अवलंबून असलेल्या असंख्य सामान्य शेतकरी, ठेविदार, सभासद, कामगार वर्ग व सहकाराचे अन्य लहान-मोठे घटक यांच्या हिताचे मोदी सरकार यांच्या निर्णयामुळे रक्षण होईल.

हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय: कोरोनाच्या लढाईविरोधात २३ हजार कोटींचे आरोग्य पॅकेज जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.