बारामती शहरातील श्रीरामनगर भागात जुन्या वादाच्या कारणातून अल्पवयीन मुलांनी एकाचा खून minors killed one in broad daylight केला. शशिकांत बाबासो कारंडे वय ४७ वर्षे मूळ राहणार मठाचीवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. Baramati Minor Killing
मुलांच्या भांडणातून घडले हत्याकांड शहरातील श्रीरामनगर भागातील कवी मोरोपंत शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. कारंडे यांचा मृतदेह येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण आहे. कारंडे हे त्यांच्या नातवाला नेण्यासाठी कविवर्य मोरोपंत शाळेजवळ आले होते. या दरम्यान काहींनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कारंडे हे बारामती लघु औद्योगिक कंपनीत एका पाईप कंपनीत नोकरीला होते. दरम्यान कारंडे यांच्या मुलाची यापूर्वी भांडणे झाली होती. त्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिला नाही. पोलिसांची पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.
हेही वाचा पुन्हा एकदा निर्भयाप्रमाणे घटना, जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण