ETV Bharat / city

म्हाडा'ची परीक्षा अचानक रद्द, विद्यार्थ्यांच्या तिव्र प्रतिक्रिया;पहा ईटीव्ही भारतचा खास आढावा

author img

By

Published : Dec 12, 2021, 12:52 PM IST

काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे,” अस म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

म्हाडा'ची परीक्षा अचानक रद्द, विद्यार्थ्यांच्या तिव्र प्रतिक्रिया;पहा ईटीव्ही भारतचा खास आढावा
म्हाडा'ची परीक्षा अचानक रद्द, विद्यार्थ्यांच्या तिव्र प्रतिक्रिया;पहा ईटीव्ही भारतचा खास आढावा

पुणे - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडून विविध पदांच्या भरतीसाठी आज आयोजित केलेल्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. काही तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द करण्यात आली असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओद्वारे दिली. विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी क्षमा देखील मागितली. मात्र, अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने तसेच रात्री उशिरा याची माहिती देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधल्या आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी पाहूया-

विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण पाहायला मिळाले

सुरवातीला आरोग्य विभागाच्या परीक्षा आणि त्यांनतर पेपर फुटीनंतर आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभार हा समोर आला असताना काल पुण्यातील सायबर पोलिसांच्या माध्यमातून म्हाडाच्या पेपरफुटी संदर्भात तीन लोकांना अटक करण्यात आल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे विविध शहरांमध्ये रात्रीच आले असल्याने या विद्यार्थ्यांना रात्री उशिरा परीक्षा रद्द झाल्याचे कळल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचे वातावरण पाहायला मिळाले.

तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा रद्द

सर्व विद्यार्थ्यांची क्षमा मागून काही अपरिहार्य कारणामुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे उद्याची होणारी म्हाडाची परीक्षा आणि त्यानंतर होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून जानेवारीत घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी घराबाहेर पडून केंद्रावर जाऊ नये यासाठी इतक्या रात्री ही माहिती देत आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम

या परीक्षेसाठी पश्चिम महाराष्ट्रातुन कालच हजारो विद्यार्थी मुंबई, पुणे,बारामती आदी विविध केंद्रात पोहचले आहेत. आता त्यांना मध्यरात्रीच्या घोषणेमुळे निष्कारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही घोषणा आधीच किमान कालपर्यंत केली असती तर नाहक धावपळ,त्रास वाचला असता असा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेतील गोंधळाची परंपरा आजही कायम राहिली आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Birthday - 'शरद पवार' हे देशाच्या राजकारणातील केंद्रस्थानी असणार एक नाव!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.