ETV Bharat / city

Maharashtra Sadbhavana Nirdhar Sabha : केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेचे आयोजन - Maharashtra Day

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात शनिवारी (दि. 30 एप्रिल) महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेच आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार असून या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडणार येणार आहे. यामध्ये मनसे व भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षिय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2022, 3:27 PM IST

पुणे - महाराष्ट्र दिनाचे ( Maharashtra Day ) औचित्य साधत महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात शनिवारी (दि. 30 एप्रिल) महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभेचे ( Maharashtra Sadbhavana Nirdhar Sabha ) आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात शनिवारी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार असून या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडणार येणार आहे. यामध्ये मनसे व भाजप व्यतिरिक्त सर्वपक्षिय नेते व कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप

केंद्र सरकारवर आरोप - देशांमध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे आपल्या राज्यघटनेलाच सुरुंग लागत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात पुण्यात एल्गार - केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असून या महगाई विरोधात काम करण्याचे सोडून यावरून जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जगताप यांनी केला. केंद्र सरकारच्या याच धोरणांच्या विरोधात महाविकास आघाडीने या सभेचे आयोजन केले आहे.

हेही वाचा - ST bus brakes fail in Pune : पुण्यात एसटी बसचा ब्रेक फेल, अनेक वाहनांना दिली धडक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.