ETV Bharat / city

amit shah in pune - महाराष्ट्रातील सरकार ही तीन चाकांची पंक्चर रिक्षा, फक्त प्रदूषण करते - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

महाराष्ट्रातील आघाडी सरकार तीन चाकांची ऑटो रिक्षा असून या रिक्षाची तीनही चाके वेगवेगळ्या दिशांनी जात असल्याची टीका या आधी मी केली होती. पण त्यात आता मला दुरुस्ती करावी वाटते. या रिक्षाची तीनही चाके पंक्चर असून ती रिक्षा चालत नाही, अशी टीका अमित शहांनी ( amit shah in pune ) या वेळी केली. ही रिक्षा फक्त धूर सोडत असून प्रदूषण करत असल्याचा टोमणा शहा यांनी मारला.

maha vikas aghadi puncture rickshaw
आघाडी सरकार रीक्षा अमित शहा पुणे
author img

By

Published : Dec 19, 2021, 11:01 PM IST

पुणे - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे. राज्यातील 2019 च्या निवडणुकीत मी महाराष्ट्रात आलो होतो. मी स्वतः शिवसेनेशी संवाद साधला होता. देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूल लढवली जाणार होती. आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असे ठरले होते. पण, नंतर शिवसेनेने वचन मोडले. सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आणि ज्यांच्याशी गेली वीस वर्षे भांडत होते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले, अशी टीका शहा ( amit shah in pune ) यांनी शिवसेनेवर केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

हेही वाचा - omicron patients - पुणे जिल्ह्यातील पाच वर्षीय मुलाला ओमायक्रोनची लागण

पुण्यात भाजपच्या बूथ संपर्क अभियानाचा प्रारंभ शहा यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पक्षाचे सर्व आमदार या वेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार ही 3 चाकांची पंक्चर रिक्षा

शहा म्हणाले की, मी निवडणुकीनंतर खोटे बोललो, वचन मोडले, असा आरोप ते करत होते. एक मिनिटासाठी ते खरे बोलतात, असे मानू. पण, त्या निवडणुकीत तुमच्या बॅनरवर मोदींचा फोटो किती मोठा होता, हे तरी आठवून पाहा. मोदींचा फोटो तुमच्या फोटोपेक्षा चौपट मोठा होता. याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. आणि मोदी यांनी एकत्रित तुमच्यासोबत सभा घेतल्या. त्या सभांतही फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे आम्ही सांगितले होते. पण, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून तुम्ही विश्वासघात केला. सत्तेवर आलात. पण सध्या येथे काय सुरू आहे? महाराष्ट्रातील आघाडी सरकार तीन चाकांची ऑटो रिक्षा असून या रिक्षाची तीनही चाके वेगवेगळ्या दिशांनी जात असल्याची टीका या आधी मी केली होती. पण, त्यात आता मला दुरुस्ती करावी वाटते. या रिक्षाची तीनही चाके पंक्चर ( maha vikas aghadi puncture rickshaw ) असून ती रिक्षा चालत नाही, अशी टीका अमित शहांनी यावेळी केली. ही रिक्षा फक्त धूर सोडत असून प्रदूषण करत असल्याचा टोमणा शहा यांनी मारला.

हे सरकार बिनकामाचे

महाराष्ट्रातील सरकार हे राज्याला अधोगतीकडे नेत असल्याचे सांगत या राज्याचे जुने वैभव हे सरकार पुन्हा मिळवून देऊ शकत नाही. हे सरकार बिनकामाचे आहे. हे सरकार घालविण्याचे काम पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालापासून सुरू झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदीजींच्या नेतृत्वाची मोहिनी मतदारांवर आहे. तुम्ही केलेली कामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास अमित शहा यांनी वेळी व्यक्त केला.

ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्य टिळक म्हणाले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच. मात्र, उद्धव ठाकरे यांचे सरकार म्हणते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो कोणत्याही प्रकारे मिळवणारच. जर तुम्हाला हिम्मत असेल तर, आत्ता राजीनामा द्या आणि सगळे पक्ष वेगवेगळी निवडणूक लढवा आणि एकीकडे भारतीय जनता पक्ष उभे आहे. बघूया, काय होते ते, असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

हेही वाचा - Amit Shah Pune Visit : एनडीआरएफ म्हणजे विश्वासाचे प्रतीक - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.