ETV Bharat / city

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती, 62 किलोचा मोदक अर्पण - उद्धव ठाकरे वाढदिवस गणपती आरती पुणे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या काळात यश मिळावे, तसेच राज्याच्या विकास त्यांच्या हातून होवो. देशाची सेवा करण्यासाठी देवाने शक्ती आणि युक्ती दोन्ही द्यावी, अशी प्रार्थना समस्त पुणेकर तसेच शिवसैनिकांच्या वतीने बाप्पाच्या चरणी करण्यात आली.

Dagdusheth Ganapati Temple Aarti for uddhav thackeray
उद्धव ठाकरे वाढदिवस गणपती आरती पुणे
author img

By

Published : Jul 26, 2022, 2:18 PM IST

पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येणाऱ्या काळात यश मिळावे, तसेच राज्याच्या विकास त्यांच्या हातून होवो. देशाची सेवा करण्यासाठी देवाने शक्ती आणि युक्ती दोन्ही द्यावी, अशी प्रार्थना समस्त पुणेकर तसेच शिवसैनिकांच्या वतीने बाप्पाच्या चरणी करण्यात आली.

माहिती देताना निलम गोऱ्हे

हेही वाचा - बनावट मॅरेज सर्टिफिकेट करून केले व्हायरल, चंदननगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे शहर शिवसेना आणि महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील सुप्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली. या निमित्ताने श्रींना ६२ किलोचा केशरी मोदक देखील अर्पण करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एक ऑगस्टला दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करणार आहे. यावर गोऱ्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी बाळासाहेब ठाकरे यांचा वाक्य स्वतः ऐकलेला आहे. देवाच्या देवळात येत असताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवून यायचे. आम्ही कधीही कोणाच्याही विरोधात आरती केलेली नाही. आम्ही राजकीय विरोध जरी असला तरी मंदिरात ते आणत नाही. ही आमच्या पुण्याची देखील संस्कृती आहे, अस गोऱ्हे म्हणाल्या.

महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्वच निर्णय हे सरकार बदलत आहे, असे गोऱ्हे यांना विचारल असता ते म्हणाले की मी यावर काहीही राजकीय बोलणार नाही. कारण आमच्या दृष्टीने नवीन वर्षाची सुरवात होत आहे आणि त्याचा संकल्प आम्ही करत आहोत. मंत्रिमंडळाबाबत विचारले असता, आज प्रत्येक गोष्टीत मंत्री नसल्याने अडचण निर्माण होत आहेत. हे खरे आहे. आज आदित्य ठाकरे यांचा जो दौरा सुरू आहे तो दौरा बाळासाहेबांचा दौरा असल्याची आठवण सर्वांना होत आहे. विशेष म्हणजे, पैठण येथील दौरा पहिला तर बाळासाहेब यांच्या दौऱ्याची आठवण लोकांना झाली आहे. शिवसेना सत्तेत असो की विरोधात असो मदतीचा हात हा नेहेमी चालू ठेवा हेच सूचना आम्ही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत, असे देखील यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.

बावनकुळे यांनी जे आज म्हटले आहे त्यावर गोऱ्हे यांना विचारले असता ते म्हणाले की, बावनकुळे यांना जी दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे, त्यामुळे त्यांना मातोश्रीच्या आतमध्ये काय चालते काय नाही हे कळते. ऊर्जा मंत्री असताना त्यांनी काहीतरी यंत्र बसवलेला असावा. परंतु, उद्धव ठाकरे हे मनात जे आहे तेच बोलत असतात, असे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या.

हेही वाचा - Uddhav Thackeray Interview: घ्या निवडणुका, होऊ द्या जनतेच्या कोर्टात फैसला- उद्धव ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.