पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेपरफुटीचे प्रकरण समोर आले ( TET Exam Paper Leak ) असून, यात अनेक मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. 2019 च्या टीईटी परीक्षेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये देखील 1 हजार 701 अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पात्र करण्यात आल्याचं पुणे पोलिसांच्या तपासात ( Pune Police Investigation ) समोर आलं ( TET Scam 2018 ) होतं. या बोगस शिक्षकांची यादी ( Bogus Teachers List Maharashtra ) समोर आली असून, यात सर्वाधिक धुळे,नाशिक,जळगांव आणि नंदुरबार या जिल्ह्यातील बोगस शिक्षक आढळून आले आहे.
पहा कोणत्या जिल्ह्यात किती आहेत बोगस शिक्षक
2018 च्या टीईटी परीक्षेत 37 जिल्ह्यात एकूण 1701 बोगस शिक्षक आहेत.
धुळे (२६३),
नाशिक( २३६),
जळगाव (२१९),
नंदुरबार (२०४),
ठाणे (१०२),
अाैरंगाबाद (७०),
मुंबई पश्चिम (६८),
मुंबई उत्तर (८३),
मुंबई दक्षिण (३०),
पालघर (३४),
पुणे (४२),
साेलापूर, (२८),
अहमदनगर (२२)
सांगली (२७),
जालना (१४),
बीड (३७),
बुलढाणा (७४),
अमरावती (३५),
नांदेड (१९),
काेल्हापूर (१५)
अशी बाेगस परीक्षार्थींची यादी पाेलीस तपासात समाेर आली आहे.