ETV Bharat / city

उच्च न्यायालय राज्य सरकारवर देखील ताशेरे ओढू शकते - कायदेतज्ञ अॅड. आसिम सरोदे - Adv. Asim Sarode

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला आहे. नारायण राणे यांना अटक होणार यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. राणे यांनी वक्तव्य केल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडलेला नसल्याने उच्च न्यायालय कदाचित असा निर्णय देऊ शकते.

कायदेतज्ञ अॅड. आसिम सरोदे
कायदेतज्ञ अॅड. आसिम सरोदे
author img

By

Published : Aug 25, 2021, 1:07 PM IST

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला आहे. नारायण राणे यांना अटक होणार यावरून दोन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे. राणे यांनी वक्तव्य केल्यानंतर सामाजिक सलोखा बिघडलेला नसल्याने उच्च न्यायालय कदाचित असा निर्णय देऊ शकते. तसेच जी कलमे लावण्यात आली आहे ती चूकीच्या पद्धतीने लावण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालय राज्य सरकारवर ताशेरे देखील ओढू शकते, असे मला कायद्याच्या दृष्टीने वाटत आहे, अशी माहिती कायदेतज्ञ आसिम सरोदे यांनी दिली.

उच्च न्यायालय राज्य सरकारवर देखील ताशेरे ओढू शकते

इतर पोलिसांनी मोठेपणा दाखवावा

नारायण राणे यांच्या वादग्रस्त विधानानंतर महाड, नाशिक, पुणे, ठाणे, मुंबई येथे गुन्हे दाखल झाले आहे. या शहरातील पोलिसांनी देखील मोठेपणा दाखवून नारायण राणे यांना पुढे अटक करू नये. कारण असे नाही कि खूप मोठे आरोपी आहे आणि त्याला अटक केलीच पाहिजे. आज राजकीय सामाजिक परिस्थिती वाईट स्थराला जात आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होत आहे. नागरिकांचे नुकसान होऊ नये म्हणून पोलिसांनी कार्यवाहीची पद्धत ठरवली पाहिजे असेही यावेळी सरोदे यांनी सांगितले.

राणेंना देखील समज देणार

नारायण राणे यांच्या अडचणीत आता पुढे वाढ होणार नाही. जेवढ्या अडचणी यायच्या होत्या तेवढ्या येऊन गेल्या आहेत. पुणे आणि नाशिक पोलीस त्यांना फक्त जबाब घेण्यासाठी बोलावू शकतात. मात्र उच्च न्यायालयात नारायण राणे यांच्यावर देखील ताशेरे ओढण्यात येतील. जबाबदार व्यक्तीने जबाबदारीने वक्तव करायला पाहिजे. जबाबदार पदावर बसून देखील माणूस जबाबदार होत नाही हे राणे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालं आहे. यापूढे अश्या पद्धतीच्या वक्तव्यापासून लांब राहून एक जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचे वक्तव्य यापूढे करू नये, असा सल्ला देखील न्यायालय त्यांना देऊ शकते, असेही यावेळी सरोदे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.