ETV Bharat / city

पुण्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ : क्रीडा मंत्री सुनिल केदार - sports university in Pune

सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथे तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान केला. त्या वेळी ते बोलत होते.

Sports Minister Sunil Kedar
क्रीडा मंत्री सुनिल केदार
author img

By

Published : Aug 10, 2021, 4:49 PM IST

सातारा - राज्यात उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी दिली. पुढच्या वेळेस प्रवीण जाधव देशासाठी नक्कीच गोल्ड मेडल जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

satara
क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी तिरंदाज प्रवीण जाधव यांचा केला सन्मान

सातारा जिल्ह्यातील सरडे (ता. फलटण) येथे तिरंदाज प्रवीण जाधव याच्या घरी क्रीडा मंत्री सुनिल केदार यांनी भेट देऊन प्रवीण जाधव यांचा सन्मान केला. त्या वेळी ते बोलत होते.

हेही वाचा - राज कुंद्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत स्थगित

राज्य शासन खेळाडूंच्या पाठीशी -

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यामधील सरडे सारख्या छोट्याशा गावामधून प्रवीण जाधव यांनी स्वतःची कला कौशल्य ओळखून क्रीडा प्रबोधिनीमध्ये जाऊन तिरंदाजी बाबतचे शिक्षण घेतले. तालुक्याचे व राज्याचे नाव उंचावेल अशी टोकियो येथील ऑलम्पिकमध्ये कामगिरी बजावली. राज्यातील खेळाडूंनी खेळावरच लक्ष केंद्रीत करावे, राज्य शासन सर्व खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही क्रीडामंत्री केदार यांनी यावेळी दिली.

खेळाडूंनी सर्वस्व पणाला लावून खेळावे

क्रीडामंत्री म्हणून काम करत असताना या विभागाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णतः वेगळा आहे. राज्यांमध्ये विविध खेळाडू निर्माण झाले पाहिजेत. खेळाडू म्हणून खेळत असताना प्रत्येकालाच मेडेल मिळेलच असे नाही. परंतु खेळाडूंनी आपले सर्वस्व पणाला लावून खेळले पाहिजे. खेळाडूंसाठी पुण्यातील बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फलटणसाठी निधी द्या

फलटण येथे क्रीडा संकुल उभे राहण्यासाठी क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार दीपक चव्हाण यांनी केली. यावर्षी ऑलंपिक मध्ये खेळताना मी आपल्या देशासाठी पदक आणू शकलो नाही, परंतु आगामी ऑलिंपिक मध्ये मी नक्कीच पदक आणेन. त्या व त्यासाठीच मी कार्यरत राहीन, अशी ग्वाही तिरंदाज प्रवीण जाधव यांनी दिली. प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महेंद्र सूर्यवंशी - बेडके, महेश खुंटाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - अकरावी प्रवेशासाठीची CET मुंबई हायकोर्टाकडून रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.