ETV Bharat / city

Ganesh Chaturthi Recipes :यंदा पुण्यात पफ मोदकाला जास्त मागणी - चॉकलेट मोदक

मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ . आतापर्यंत आपण तळलेले, उकडीचे मोदक खाल्ले असतील मात्र पुण्यात सध्या मुर्तीज बेकरी ( Murtijs Bakery Pune ) च्या चॉकलेट मोदक ( Chocolate Modak ) आणि पफ मोदक ( Puff Modaka In Pune ) ची चलती असून या दोन्ही मोदकांना मोठ्या प्रमाणत मागणी आहे.

Puff Modaka
पफ मोदक
author img

By

Published : Sep 1, 2022, 5:58 PM IST

पुणे : दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी कोणत्याही निर्बंधाशिवाय गणेश उत्सव साजरा ( Ganeshotsav 2022 )होत आहे. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. गणपती बापा म्हटले की आठवण येते ती मोदकाची. मोदक हा गणपती बाप्पाचा सर्वात आवडता पदार्थ. आतापर्यंत आपण तळलेले, उकडीचे मोदक खाल्ले असतील मात्र पुण्यात सध्या मुर्तीज बेकरी ( Murtijs Bakery Pune ) च्या चॉकलेट मोदक आणि पफ मोदक ( Puff Modaka In Pune )ची चलती असून या दोन्ही मोदकांना मोठ्या प्रमाणत मागणी आहे.

विविध प्रकारचे मोदक - पुण्यातील कॅम्प परिसरातील मूर्तीज बेकरी येथे गणेशोत्सवाच्या ( Ganeshotsav 2022 ) निमित्ताने भाविकांसाठी खास चॉकलेट, बिस्कीट मोदक, फ्लेवर मोदक, ड्राय फ्रुट मोदक, बटर स्कॉच मोदक ( Butter Scotch Modak )आणि सर्वात महत्वाचा म्हणजे यंदा पफ मोदक असे मोदकाचे विविध प्रकार बनविण्यात आले आहेत. यात सर्वात जास्त पफ नावाच्या मोदकाला मोठी मागणी आहे. त्या खालोखाल चॉकलेट मोदकला( Chocolate Modak ) देखील मोठी मागणी आहे.

पुण्यात मिळतायत चॉकलेट आणि पफ मोदक....पफ मोदकाला यंदा जास्त मागणी

पफ मोदक म्हणजे काय? पफ मोदकाची चर्चा सध्या पुण्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. पफ मोदक वर खारी पॅटिस चे कवच असते ते त्यापासून बनलेलं आहे. त्यात साखर, बेदाणे, काजू, बदाम आणि मिल्क शेकचे सारण तयार करून आत मध्ये टाकलेले असतात. त्यामुळे हे पफ मोदक 15 दिवसांपर्यंत टिकतात. यंदाच्या वर्षी या मोदकांना मोठी मागणी असून नागरिक मोठ्या प्रमाणावर पफ मोदक खरेदी करत आहे.पफ मोदक हे 15 दिवसांपर्यंत टिकतात. त्यामुळे अनेकजण हे मोदक घेण्यासाठी गर्दी करत असून बाहेर गावी पाठवण्यासाठी देखील पफ मोदक घेतले जात आहेत.

यंदा मोठ्या प्रमाणावर खरेदी - गेल्या अनेक वर्षापासून मूर्तीज बेकरी गणेशोत्सवात विविध प्रकारचे तसेच खास करून चॉकलेट मध्ये वेगवेगळे प्रकार करून मोदक बनवत असतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात या चॉकलेट मोदक ला मागणी असते तसेच दिवाळीत चॉकलेट चे फटाके,चॉकलेट चे राख्या असे विविध सणांच्या दिवशी ज्या त्या सणानुसार पदार्थ बनवत असतात.यंदा निर्बंध नसल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर चॉकलेट मोदक खरेदीसाठी गर्दी करत आहे.मोदक घेण्यासाठी जिल्ह्यातून नागरिक येत आहेत. शिवाय बाहेर गावी मोदक पार्सल पाठवण्यासाठी विशेष सोय करण्यात आली आहे.

हेही वाचाGanesh Chaturthi Recipes: गणपती बप्पाच्या स्वागतासाठी केसर पिस्ता मोदक; जाणून घ्या सोपी रेसिपी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.