ETV Bharat / city

राज्यात 10 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज - हवामान विभाग महाराष्ट्र

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
author img

By

Published : Aug 6, 2019, 5:14 PM IST

पुणे - राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चालू असलेली संततधार पुढील पाच दिवस कायम रहाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

दहा ऑगस्ट नंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्‍यता असून, कोकण व गोव्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच नऊ आणि दहा ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. यासोबत मराठवाड्यासह विदर्भातही पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई शहर आणि परिसरामध्ये सात तारखेपासून जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली या भागांतील घाट परिसराला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Intro:महाराष्ट्रात 10 ऑगस्ट नंतर पावसाचा जोर ओसरेल हवामान विभागाचा अंदाजBody:mh_pun_02_weather_warning_121_7210348

anchor
राज्यात सध्या अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसापासून नागरिकांची आणखीन पाच दिवस सुटका नसल्याचं हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजा नंतर दिसून येत आहे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र गोवा कोकण मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात येत्या पाच दिवसात पावसाचा जोर कायम राहणार आहे दहा ऑगस्ट नंतर पाऊस कमी होईल असा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे ोकण-गोवा मध्य महाराष्ट्रात पुढचे पाच दिवस सर्वदूर पावसाची शक्‍यता असून कोकण गोव्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे नऊ आणि दहा तारखेला जोरदार पाऊस या भागात होईल तसेच मध्य महाराष्ट्रात नऊ तारखेला जोरदार ते अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यातही पुढचे तीन दिवस पावसाची शक्यता आहे विदर्भातही पुढचे तीन दिवस पाऊस होईल तर सात आणि आठ तारखेला काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता विदर्भात व्यक्त करण्यात आली आहे मुंबई शहर आणि परिसरामध्ये सात तारखेपासून जोरदार पाऊस होईल अशी शक्यता असून रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये येत्या तीन दिवसात जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून नाशिक पुणे कोल्हापूर सातारा सांगली या भागातल्या घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे
Byte डॉ अनुपम कश्यपी, शास्त्रज्ञ हवामान विभागConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.