ETV Bharat / city

आर्मी बेस वर्कशॅापमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना अटक - pune police news

आर्मी बेस वर्कशॅापमधून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर लष्करातील जवानांकडून तपासणी करण्यात येते. बनसोडे, आठवले, साबळे, रासकर टेम्पोतून इलेक्ट्रीक साहित्य, रशियन बनावटीचा रेडिएटर तसेच अन्य साहित्य टेम्पोतून घेऊन जात होते. प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रिक साहित्य बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

four persons arrested army camp stealing electric material in pune
आर्मी बेस वर्कशॅापमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना अटक
author img

By

Published : Aug 4, 2022, 12:24 PM IST

पुणे - खडकीतील ५१२ आर्मी बेस वर्कशॅापमधून इलेक्ट्रिक साहित्य चोरी करणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली. चौघे जण ठेकेदारी पद्धतीने काम करत असून रणगाड्यांसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक साहित्य चोरुन नेत असताना त्यांना पकडण्यात आले. सचिन सिद्धप्पा बनसोडे (वय ३२), आमोगसिद्ध केशव आठवले (वय ३८), विकास आदिनाथ साबळे (वय ३१, तिघे रा. पिंपळे गुरव), मोहन उत्तम रासकर (वय ४३, रा. भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी - लष्करातील सुभेदार बाबा बन्सीलाल (वय ४८) यांनी या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खडकीतील ५१२ आर्मी बेस वर्कशॅापमध्ये लष्करातील रणगाड्यांची देखभाल आणि दुरुस्तीचे काम चालते. आरोपी बनसोडे, आठवले, साबळे, रासकर एका खासगी कंपनीकडून ठेकेदारी पद्धतीने आर्मी बेस वर्कशॅापमध्ये काम करत आहेत. आर्मी बेस वर्कशॅापमधून ये-जा करणाऱ्या प्रत्येकाची प्रवेशद्वारावर लष्करातील जवानांकडून तपासणी करण्यात येते. बनसोडे, आठवले, साबळे, रासकर टेम्पोतून इलेक्ट्रीक साहित्य, रशियन बनावटीचा रेडिएटर तसेच अन्य साहित्य टेम्पोतून घेऊन जात होते. प्रवेशद्वारावर टेम्पोची तपासणी करण्यात आली. तेव्हा इलेक्ट्रिक साहित्य बाहेर विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. चौघांना अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक मोहन साळवी तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.