ETV Bharat / city

Heavy Rains in Pune Bhor : वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हा परिषद शाळेचे उडाले पत्रे; कुडली गावातील घटना - school of Kudli village have been blown

पुणे येथील भोर तालुकामधील पश्चिमपट्ट्यात मुसळधार पावसामुळे ( Heavy Rains in Pune Bhor ) भागात दरडी कोसळण्याचा, रस्ता खचण्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. कुडली गावच्या जिल्हा परिषद शाळेचे ( Zilla Parishad school of Kudli ) पत्रे उडून गेले ( school of Kudli village have been blown ) आहेत. त्यामुळे शाळेत ठेवलेल शैक्षणिक साहित्य भिजल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले

Zilla Parishad school of Kudli
कुडली गावची जिल्हा परिषद शाळा
author img

By

Published : Jul 16, 2022, 5:18 PM IST

पुणे : पुण्यातल्या भोर तालुक्यातल्या पश्चिमपट्ट्यात जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने ( Heavy Rains in Pune Bhor ), कुडली गावच्या जिल्हा परिषद शाळेचे ( Zilla Parishad school of Kudli ) पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे शाळेत ठेवलेल शैक्षणिक साहित्य भिजल्याने शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले ( school of Kudli village have been blown ) आहे. रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दोनच वर्षांपूर्वी शाळेचे दुरुस्तीचे काम करण्यात आले होते.

कुडली गावची जिल्हा परिषद शाळा

भोर तालुक्यात मुसळधार : भोर तालुक्यातल्या घाटमाथ्यावर गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या भागात दरडी कोसळण्याचा, रस्ता खचण्याच्या घटना घडताहेत. तर अनेक ठिकाणी शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अजूनही पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाकडून अलर्ट राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.

कुडली गावातील जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान : भोर तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यातील दुर्गम भागात असलेल्या कुडली गावात, रात्री 11 च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने कुडलीतल्या जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडून गेले. त्यामुळे शाळेत असलेले शैक्षणिक साहित्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.

ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह : रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पत्र्यांचा आवाज झाल्याने नागरिक घराबाहेर आले तेव्हा ही बाब सामोर आली. मागच्या दोनच वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून शाळेचे काम करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेचे नुकतेच बांधकाम करण्यात आले होते. तरी आता अशा प्रकारे लगेच बांधकामाची हानी झाल्याने व पत्रे उडाल्याने स्थानिकांमधून ठेकेदाराच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेही वाचा : Thane City Becoming Unauthorized Buildings City : ठाण्यात अनधिकृत धोकादायक बांधकामांचे जाळे; "माळीण"च्या पुनरावृत्तीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.