ETV Bharat / city

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमीला विसरू नका - राज्यपाल - Pune Latest News

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे, पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.

आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना मातृभूमीला विसरू नका - राज्यपाल

author img

By

Published : Jan 19, 2021, 5:15 PM IST

पुणे - आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरू नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे, पुण्यातल्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. दरम्यान यावेळी सेंट्रल सॉफीस्टीकेटेड ऍनालेटिकल इन्स्टुमेंटेशन फॅसिलिटी आणि प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबीनचे डिजिटल स्वरुपात अनावरण व सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणे आवश्यक आहे. सदाचार ही जीवनातील महत्त्वपूर्ण बाब आहे. सदाचारी व्यक्तीचा सदैव गौरव केला जातो, यासाठी सदाचारी बना. परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करु नका. आपल्या मातृभूमीचा व मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे

नाविन्यपूर्ण बाबींचे अधिकाधिक ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे, 'भारत' हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, भविष्यात देखील आपला देश विविध बाबींमध्ये अग्रेसर ठरण्यासाठी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करा आणि जगभरात चांगले नाव कमवा. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत असं देखील यावेळी कोश्यारी यांनी म्हटले आहे. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमधील अनेक विद्यार्थ्यांनी नावलैकिक मिळवले असल्याचे सांगत त्यांनी यावेळी महाविद्यालयाचे कौतुक देखील केले. या कार्यक्रमाला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची देखील उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.