ETV Bharat / city

Death Threat To Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी - रुपाली चाकणकर जीवे मारण्याची धमकी

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Death Threat To Rupali Chakankar ) यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलेला आहे.

Death Threat To Rupali Chakankar
Death Threat To Rupali Chakankar
author img

By

Published : May 30, 2022, 9:18 PM IST

पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ( Death Threat To Rupali Chakankar ) यांना जीवे मारण्याची धमकी आलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात हा धमकीचा फोन आलेला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे. पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा धमकीचा फोन आज दुपारच्या सुमारास महिला आयोगाच्या कार्यालयात आलेला होता.

कार्यालयात आला फोन - अहमदनगरमधील एका व्यक्तीने फोन केल्याच सांगितलं जातं आहे. आत्ता हा व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत आहे. याआधी देखील अश्याच पद्धतीने रुपाली चाकणकर यांना धमकीचे पत्र आले होते. एका व्यक्तीने तर फोन करत चाकणकर यांचे पुण्यातील कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली होती. त्यांनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या व्यक्ती विरोधात तक्रार देखील देण्यात आली होती.

हेही वाचा - new era of drone delivery : देशात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे मिळणार पोस्टाचे पार्सल; कच्छमध्ये घेण्यात आली चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.