सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा होणार विराजमान - दगडूशेठ गणपती मूर्ती सियाचीनमध्ये विराजमान
सियाचीनमध्ये (Siachen) भारतीय सीमेवर सैनिकांच्या (Indian Army) सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती (Dagdusheth Ganpati) विराजमान होणार आहे. भारतीय लष्करातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची २ फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक तेथे सीमेचे रक्षण करत असतात.
![सियाचीनमध्ये भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळांमध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा होणार विराजमान Dagdusheth](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15051527-720-15051527-1650290053544.jpg?imwidth=3840)
पुणे - सियाचीनमध्ये (Siachen) भारतीय सीमेवर सैनिकांच्या (Indian Army) सर्वधर्म स्थळामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिकात्मक मूर्ती (Dagdusheth Ganpati) विराजमान होणार आहे. भारतीय लष्करातील २२ मराठा बटालियनच्या सैनिकांकडे दगडूशेठ गणपतीची २ फुटांची मूर्ती मंदिरामध्ये आयोजित कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली. सियाचीन ही जगातील सर्वात उंचावरची युद्धभूमी असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिक तेथे सीमेचे रक्षण करत असतात. दगडूशेठ गणपतीच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती एकता व अखंडतेचे प्रतिक असलेल्या भारतीय सैनिकांच्या सर्वधर्म स्थळामध्ये स्थापन करण्याची इच्छा बटालियनतर्फे व्यक्त केली. ट्रस्टने त्यांच्या इच्छेला मान देऊन श्रीं ची हुबेहुब २ फूट उंचीची प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले.
मूर्ती बटालियनच्या जवानांकडे सुपुर्द - दगडूशेठची मूर्ती पुण्यातील मूर्तीकार भालचंद्र देशमुख यांनी साकारली आहे. नुकतीच ही मूर्ती बटालियनच्या माऊली रेडेकर, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, विजय धनगर या जवानांकडे देण्यात आली. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, प्रकाश चव्हाण, माऊली रासने, मूर्तिकार भालचंद्र देशमुख, सिद्धार्थ गोडसे, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. यापूर्वी देखील काश्मीर येथील गुरेज सेक्टर येथे ६ मराठा बटालियनने तसेच त्यानंतर १ व ६ मराठा बटालियनने अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे.