पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( Maharashtra Public Service Commission ) धमकीवजा सूचनेच्या ट्विटने एमपीएससी आंदोलक विद्यार्थी हे बॅकफूटवर आले आहेत.या विद्यार्थ्या कारवाईच्या भीतीने आज होणारे आंदोलन स्थगित केले आहे. पुण्यातील शास्त्री रोड येथे ( Shastri Road Pune ) अहिल्यादेवी शिक्षण मंडळ येथे होणारे आंदोलन स्थगित केले असले तरी पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांनी केली होती मागणी - राज्यसेवा मुख्य परीक्षेतील ( State Services Main Exam ) नव्या बदलासंबंधी विद्यार्थ्यांचे काही आक्षेप होते. वर्णनात्मक परीक्षापद्धतीचे विद्याथ्यांनी स्वागत केले. मात्र, त्यासाठीचा अभ्यासक्रम हा अवाढव्य असून, त्याच्या तयारीसाठी पुरेसा कालावधी द्यावा. २०२३ ऐवजी २०२५ पासून अभ्यासक्रम राबवावा.अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी विद्यार्थी हे आंदोलन करणार होते.परंतु आयोगाच्या ट्विटने विद्यार्थ्यांनी आज होणारे आंदोलन स्थगित केले आहे.
काय आहे आयोगाचे ट्विट - राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या संदर्भात काही संघटित अथवा असंघटित घटकांकडून आंदोलन करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले असून अशा घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. अशा बाबी आयोगावर दबाव आणण्याचा प्रयत्न समजून उचित कारवाई करण्यात येईल, असे ट्विट आयोगाने केलं आहे.
आंदोलन केले आणि कारवाई झाली तर पुढे काय? - आज होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होणार होते. परंतु काल आयोगाचे ट्विट आले. तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने विद्यार्थी हे दडपणात आले.आंदोलन केल्यास कारवाई झाली तर पुढे काय? याभितीने आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. तर आंदोलनाच्या ठिकाणी कोणताही विद्यार्थी सहभागी होणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यानी घेतली आहे. आंदोलन बाबत कोणीही माहिती दिलेली नाही किंवा तस पत्रही आलेले नाही,आम्हाला माहिती मिळाल्याने पोलीस बंदोबस्त केला अशी माहिती, विश्रामबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.
हेही वाचा : Teacher Recruitment : शिक्षक भरती एमपीएससी मार्फत..? शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला पत्र