ETV Bharat / city

Chevening Scholarship : दीक्षा दिंडे ठरली ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी - दीक्षा दिंडे यांना चेवनिंग स्कॉलरशिप मिळाली

पुण्यातील दीक्षा दिंडे हिला नुकतीच ब्रिटिश सरकारची ( British Government Scholarship ) प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिप ( Chevening Scholarship ) मिळाली आहे. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ज्या 75 मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड करण्यात आली आहे. चेवनिंग स्कॉलरशिपसाठी अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी ( Higher education Scholarship ) परदेशात जायचे आहे. यात जगभारातील 160 देशामधून 68 मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यात पुण्याच्या दिक्षा दिंडे यांची निवड करण्यात आली आहे.

Diksha Dinde became the recipient of the prestigious British Government Scholarship
दीक्षा दिंडे ठरली ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी
author img

By

Published : Jul 3, 2022, 8:30 PM IST

पुणे - गर्ल ऑन 'विंगचेअर' ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून ओळख असलेल्या पुण्यातील दीक्षा दिंडे हिला नुकतच ब्रिटिश सरकारची ( British Government Scholarship ) प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी( Chevening Scholarship ) निवड झाली आहे. भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील ज्या 75 मुलांची या स्कॉलरशिपसाठी निवड झाली. ब्रिटिश सरकारची प्रतिष्ठित समजली जाणारी चेवनिंग स्कॉलरशिपसाठी ही अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी ( ( Higher education Scholarship ) परदेशात जायचे आहे. ज्या मुलांची आर्थिक परीस्थिती चांगली नाही अशा मुलांना ही स्कॉलरशिप दिली जाते. यंदाच्या वर्षी 160 देशांमधून 68 हजार मुलांनी या स्कॉलरशिपसाठी अर्ज केला होता. त्यात दीड हजार मुलांची निवड केली जाते. त्यातील दीक्षा दिंडे यांची निवड करण्यात आली आहे.

दीक्षा दिंडे ठरली ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित स्कॉलरशिपची मानकरी

कोण आहे दीक्षा दिंडे - पुण्यातील कात्रज येथील सोनवणे चाळीत दहा बाय बाराच्या घरात राहणारी दीक्षा जन्मापासून तिला सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासले आहे. तीला ८४ टक्के अपंगत्व, पाठीच्या कण्याची समस्या आहे. मात्र, अशी परीस्थिती असतांना देखील तीची जिद्द, हुशारी तसेच तिच्या स्वप्नाुला कोणी रोखू शकले नाही. अपंगत्वामुळे खासगी शाळेने प्रवेश नाकारलेल्या दीक्षा दिंडे हिला आज जगभरातल्या महत्त्वाच्या चर्चासत्रांसाठी सन्मानाने ‘मोटीवेशनल स्पीकर' म्हणून बोलावले जाते. व्हील चेअरशिवाय फिरता न येणारी दीक्षा आज उच्च शिक्षण, नोकरी तसेच तिच्या सामाजिक कामामुळे अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

Diksha had to face many problems due to her disability
दिक्षाला आपल्या अपंगत्वामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले

मुलांना यशाच्या मार्गाने धडे - पुण्यातील वस्तीतील मुलाचा शिक्षण, अपंग मुलांच्या समस्या, मासिक पाळी या सगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्थेत दीक्षाने काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2016 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची 'ग्लोबल युथ अँबेसिटर' म्हणून तिची निवड झाली. तसेच शाश्वत विकास', ‘तरुणांचे नेतृत्व', 'दिव्यांगांचे अधिकार' या विषयांवरील चर्चासत्रांसाठी ती आतापर्यंत मलेशिया, साऊथ कोरिया, इजिप्तमध्ये जाऊन आली आहे. दिव्यांगांना कोणत्या सोयी-सुविधा आवश्यक आहेत. त्यासाठी शहर नियोजन करताना काय उपाययोजना केल्या पाहिजेत, यावर तिने मलेशियातील चर्चासत्रात सादरीकरण केले होते. त्यानंतर तिने तसेच तिच्या सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या झेड ब्रिजच्या खाली शाळा सुरु केली आहे. सिग्लनवर भिक्षा मागणाऱ्या मुलांच्या प्रश्नांवर त्यांच्या समस्यांवर काम करण्याचा निर्धार केला. स्वत: व्हीलचेअरवर असताना सगळ्या मुलांना यशाच्या मार्गाने चालण्याचे धडे ति देत आहे.

Girl on 'Wingchair' 'Motivational Diksha Dinde
गर्ल ऑन 'विंगचेअर' ‘मोटीवेशनल दीक्षा दिंडे स्पीकर

हेही वाचा - Umesh Kolhe Murder Case : एनआयए पथकासह अमरावती पोलिसांकडून आरोपींची कसून चौकशी

सर्व श्रेय माझ्या आईला - या माझ्या यशात आज पर्यंत माझ्या अनेक सुख दुःखात माझ्या मागे खंबीरपणे उभी असलेली माझ्या आई ने माझ्यासाठी खूप मेहेनत घेतली. अनेकांनी लहान पणापासून माझ्या आईला अनेक सल्ले दिले की, तिला स्पेशल शाळेत टाका. वसतिगृहात टाका पण माझ्या आईने माझ्या साठी खूप मेहेनत घेतली. मला शिकवले. आज कात्रजच्या महापालिकेमधून सुरू झालेला प्रवास आज ब्रायटेनमध्ये पोहचला आहे. याचे सर्व श्रेय माझ्या आईला जातो. अस देखील यावेळी दीक्षा दिंडे हिने सांगितले.

Chevening Scholarships are for children who want to go abroad for higher education.
चेवनिंग स्कॉलरशिपसाठी अशा मुलांना मिळते ज्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे आहे.

हसत हसत आयुष जागा - अपंगत्वामुळे तिला अनेक ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अनेकांचे बोलणे ऐकावे लागले. मात्र, ती थांबली नाही. कॉलेजच्या सहलीत अपंगत्वामुळे तिला डावलण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिने जगभर फिरण्याचा निर्णय घेतला. ती स्वत:ला 'गर्ल ऑन व्हील्स' नाही तर 'गर्ल ऑन विग्ज' म्हणते. तिच्या या प्रवासाची आजपर्यंत अनेकांनी दखल घेतली आहे. अनेकदा काय होत की, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात नाही त्यासाठी आपण त्या गोष्टी धरून बसतो. शेवटी हार मानतो पण आयुष्य तेव्हाच सुंदर होईल जेव्हा तुम्ही लॅबालिटी पेक्षा असेट्स कडे लक्ष द्याल. रडत रडत जगण्यापेक्षा हसत हसत आयुष जागा तेव्हाच आयुष्य सुंदर होईल असे देखील यावेळी दीक्षा हिने सांगितले आहे.

Diksha works for her child's education in Pune
दीक्षा पुण्यात मुलाच्या शिक्षणासाठी काम करते

हेही वाचा - Eknath Shinde group : एकनाथ शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का; शिवसेनेच्या विधिमंडळ कार्यालयाला ठोकले टाळे!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.