पुणे - वाढदिवस साजरा करण्यासाठी आज नव नवीन शक्कल तरुणांकडून लढवली जाते. वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात यात काहीच शंका नाही. (Cake cutting with sword Pune ) असच काहीसा प्रकार पुण्यातील लोहियानगर परिसरात झाला आहे. दहशत निर्माण करण्यासाठी कोयत्याने केक कापून, त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या अल्पवयीन मुलावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
डीजे लावून नाचण्याचा व्हिडीओ
१४ फेब्रुवारी रोजी युनिट -१ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना, बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, लोहियानगर भागात पी.एम.सी कॉलनी नं ९ येथे वाढदिवसाचा केक कापण्यासाठी कोयताचा वापर झाला होता व तो हातात कोयता घेवुन डीजे लावून नाचण्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मिडीयावर टाकण्यात आल आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - Bappi Lahiri passes away : ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन