पुण्यात भाजपने नवाब मालिकांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - nawab malik news
अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याच्यावर आरोप केले आहेत. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील कर्वे रस्त्यावर मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
पुणे - अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याच्यावर आरोप केले आहेत. याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील कर्वे रस्त्यावर मलिक यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नवाब मलिकची त्वरित हकालपट्टी करा
मुळीक म्हणाले, 1993 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. ते घडवणाऱ्या आरोपींची संपत्ती विकत घेण्याचे काम नवाब मालिक यांनी केले आहे. ज्यांच्यामुळे शेकडो निरपराध व्यक्तींची हत्या झाली, त्यांची संपत्ती मलिक यांनी विकत घेऊन देशद्रोह केल्याचा आरोप, मुळीक यांनी केला आहे. यामुळे त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. राष्ट्रवादीने नवाब मलिकांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे. ज्या शिवसेनेने हिंदुत्वाचा नारा दिला. देशद्रोहाला मदत करणाऱ्या अशा मंत्रीबाबत शिवसेनेने दखल घेऊन कारवाई केली पाहिजे आणि राष्ट्रवादीशी काडीमोड करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
हे ही वाचा - वरळीत 200 कोटींचा फ्लॅट कुणाचा आहे? अमृता फडणवीसांच्या टीकेला मलिकांचे उत्तर