ETV Bharat / city

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते आरक्षणाबाबत भूमिका मांडतील - अजित पवार - अजित पवार लेटेस्ट न्यूज पुणे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणावर राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये आघाडीचे तिथले पालकमंत्री तसेच आमदार त्यांची भूमिका मांडतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे, ते पुण्यात मांजरी येथे बोलत होते.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Jun 15, 2021, 6:15 PM IST

पुणे - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणावर राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे, त्यामुळे कोल्हापूरमध्ये आघाडीचे तिथले पालकमंत्री तसेच आमदार त्यांची भूमिका मांडतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे, ते पुण्यात मांजरी येथे बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. त्यासाठी आता आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केली आहे, उद्या कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भूमिका मांडतील असे अजित पवार यावेळी म्हणाले. जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे, त्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले. मांजरीमधल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक बैठकीसाठी अजित पवार आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी मराठा आरक्षण, आघाडी सरकार, कोरोना स्थिती अशा विविध विषयांवर भाष्य केले.

अजित पवारांचा पत्रकारांशी संवाद

...तर कठोर निर्णय घ्यावा लागेल - अजित पवार

कोरोना परिस्थितीबाबत बोलताना, पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट सध्या 5 टक्क्यांच्या खाली आहे, मात्र पुन्हा जर पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर कठोर निर्णय घेण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. त्यामुळे निर्बंध नको असतील तर पुणेकरांनी काळजी घ्यावी, असं पवार यांनी म्हटले आहे.

विरोधकांची दुटप्पी भूमिका - अजित पवार

दरम्यान भाजपाच्या आध्यत्मिक आघाडीकडून पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत आल्याने विरोधी पक्षाच्या पोटात दुखत आहे. अनेक जण सरकार पडण्याची वाट बघत आहेत. विरोधक सातत्याने दुटप्पी भूमीक घेत आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पायी वारी न काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदाची इच्छा गैर नाही - अजित पवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती, त्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवलं आहे. हे तिघे नेते जोपर्यंत या सरकारच्या पाठीशी आहे, तोपर्यंत हे सरकार भक्कम आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही, तसेच प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. शिवसेना असेल किंवा कॉंग्रेस प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी 145 ची मॅजीक फिगर लागते, ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो असेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.

उदयनराजेंना अजित पवारांचे प्रत्युत्तर

तसेच यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्याला देखील उत्तर दिले आहे. उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने, लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं हे वक्तव्य आहे ना? कारण बोलणारे देखील लोकप्रतिनिधीच आहेत, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी उदयनराजेंच्या वक्तव्यावर दिले आहे. दरम्यान राम मंदिर ट्रस्ट घोटाळ्यासंदर्भात काल हेडलाईन सुरू होत्या, राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप होणे खूप गंभीर आहे, सगळ्यांनी त्याला देणगी दिली आहे, यावर स्पष्टीकरण येणे गरजेचे आहे, हा हिंदु धर्मियांच्या आस्थेचा प्रश्न आहे असेही यावेळी अजित पवार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - राज्यपालनियुक्त 12 आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडेच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.