राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या मुदतवाढ संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार - उपमुख्यमंत्री अजित पवार - सिताराम कुंटे मुदतवाढ अजित पवार प्रतिक्रिया पुणे
कुठे यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने का नाकारला? हे तपासून पाहावे लागेल. कारण यापूर्वीच्या मुख्य सचिवांना दोनदा मुदतवाढ मिळाली होती. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलूनच अधिकचे भाष्य करेन, असे अजित पवार म्हणाले.
पुणे - राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ काल संपला. त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला होता, मात्र त्यावर केंद्राकडून नकार आला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने का नाकारला? हे तपासून पाहावे लागेल. कारण यापूर्वीच्या मुख्य सचिवांना दोनदा मुदतवाढ मिळाली होती. मी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलूनच अधिकचे भाष्य करेन, असे अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -Schools in Pune - कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद
उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार होत्या, पण ओमीक्रॉनचा धोका नेमका किती? याचा अंदाज येत नसल्याने 15 तारखेपर्यंत शाळा न उघडण्याचे ठरले. तसेच, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 1 हजार प्रवाशांचेही ट्रेसिंग सुरू आहे, असे अजित पवार म्हणाले.
रुग्णसंख्या वाढू लागल्यानेच पुन्हा कडक निर्बंध
रुग्णसंख्या वाढू लागल्यानेच निर्बंध पुन्हा कडक करावे लागले. पुणेकरांनी उगीच गैरसमज करून घेऊ नये, असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा -Omicron Variant : राज्यात तूर्त लॉकडाऊन नाही, शाळा 1 डिसेंबरलाच उघडणार - राजेश टोपे