पुणे - पुण्यात अफजल खान वधाच्या Afzal Khan Killing Scene Police permission देखाव्याला गणेश मंडळांना Ganesh Mandal Pune पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या देखाव्याला परवानगी नाकारल्याने कोथरूड पोलिसांवर सुद्धा Kothrud Police मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पुणे पोलिसांनी दरवर्षी परवानगी लागते. त्या परवानगीच्या नियमानुसार अटी घालून आता अफजल खानच्या देखाव्यास संगम गणेश मंडळाच्या Sangam Ganesh Mandal Kothrud अध्यक्षांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळ असल्याने त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ब्राह्मण महासंघाचे Brahmin Federation आनंद दवे यांनी देखील पोलिसांचा देखाव्याला विरोध केल्यामुळे निषेध केला होता.
मनसेचे किशोर शिंदे हे या मंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर मंडळाने आणि किशोर शिंदे यांनी अनेक ठिकाणी याचा पाठपुरावा केला. उद्या ते पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार होते. आज जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्याने निदर्शने करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण होईल, म्हणूनच पोलिसांकडूनच आता परवानगी दिली असल्याचे बोलल्या जात आहे. अफजलखानाच्या कोथळ्याच्या देखाव्यास पोलिसांनी परवानगी नाकारली, भारतात नाहीतर पाकिस्तानात दाखवायचं का ? असा सवाल मंडळाच्या वतीने उपस्थित करण्यात आला होता.
हेही वाचा - Afzal Khan Killing Scene अफजल खानचा वध हा देखावा इतिहासाचा जागर करणारा, पुण्यातील मुस्लिम बांधवांचे मत