ETV Bharat / city

पुणे जिल्ह्यासाठी 'टेस्टींग इन्चार्ज' ; अजित पवारांचे निर्देश

पिंपरी-चिंचवड तसेच मुख्य शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन सक्रिय आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज पदावर प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

ajit pawar in pune
टेस्टींग इन्चार्ज पदावर प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
author img

By

Published : Jul 3, 2020, 6:50 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड तसेच मुख्य शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन सक्रिय आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्ह्यासाठी टेस्टींग इन्चार्ज पदावर प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कडक निर्बंध राबवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीपकुमार व्यास, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या सह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कोविड रुग्णांवर उपचार करतांना नॉन-कोविड रुग्णाकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे पवार म्हणाले. काही रुग्णालयामध्ये डॉक्टर कोविड कक्षामध्ये जात नसल्याच्या तक्रारी येत आहे. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश पवार यांनी दिले आहेत.

अजित पवारांच्या सूचना

ग्रामीण भागात विविध समित्या कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने कोरोना विषाणूच्या संसर्गावर कसे नियंत्रण मिळवता येईल, यासाठी योजना तयार करा. शहरातून ग्रामीण भागात तसेच ग्रामीण भागातून शहरी भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांची तपासणी पोलिसांनी करावी. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये शासनाच्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्यात यावी. सोलापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी कारवाई करावी.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर उद्योगधंदे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे कारखान्यातील कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी कारखान्यांच्या मालकांनी कामगारांची राहण्याची करावी. तसेच काम करत असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार मास्क वापरण्यास, हात वारंवार धुण्यास आणि शारीरिक अंतर पाळण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.