पुणे - आम आदमी पक्षाच्यावतीने ( Aam Aadmi Party ) भर पावसात आज जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा ( Funeral ) काढण्यात आली आहे. वीज दरवाढ, महागाई, इंधन दर वाढ, जीवनावश्यक खाद्यावर जीएसटी या विरोधात आता पुणेकर चांगेलच संतापले आहेत हे यावरून स्पष्ट होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा. मोदी सरकारचा निषेध - कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा काढण्यात आली. अरोरा टॉवरजवळ कॅम्प ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालापर्यंत भर पावसात अंत्ययात्रा काढून मोदी सरकारचा निषेध ( Protest Against Modi government ) व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी मोदी सरकारविरोधात विविध घोषणा देण्यात आल्या. केंद्र सरकारविरोधात फलकबाजी ( Posters against Central Govt ) करण्यात आली.
जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढल्या - गेल्या काही दिवसांपासून वीज दरवाढ, गॅस सिलेंडरच्या किंमतीत सतत वाढ ( gas cylinder price increase )होत आहे. पेट्रोल - डिझेल - सीएनजीमध्ये दरवाढ, तसेच जीवनावश्यक खाद्य पदार्थांवर 5 टक्के जीएसटी ( 5 percent GST on food items ) लावण्यात आली त्यामुळे सर्व सामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. एकीकडे दोन वर्षे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल झालेले असताना केंद्र सरकारच्यावतीने आत्ता जीवनावश्यक वस्तूंमध्ये वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. याचा निषेध म्हणून आज जीवनावश्यक वस्तूंची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे.अस यावेळी आंदोलकांनी सांगितल आहे.
हेही वाचा - State Cabinet Meeting : औरंगाबाद आणि उस्मानाबादचे पुन्हा नामांतर, नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव